Join us  

राज्यात दिवसभरात दहा हजारांहून अधिक काेराेना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मागील तीन दिवसांपासून राज्यात काेराेनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख आठ ते नऊ हजारांच्या वर गेला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मागील तीन दिवसांपासून राज्यात काेराेनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख आठ ते नऊ हजारांच्या वर गेला आहे. त्यामुळे राज्य शासनासमोर पुन्हा एकदा संसर्ग नियंत्रणाचे आव्हान उभे राहिले आहे. राज्यात शनिवारी १०,१८७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ४७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

राज्यातील काेरोनाबाधितांची एकूण संख्या २२,०८,५८६ झाली असून, बळींचा आकडा ५२ हजार ४४० झाला आहे. दिवसभरात ६,०८० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण २०,६२,०३१ रुग्ण काेराेनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.३६ टक्के झाले असून सध्या ९२,८९७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६७,७६,०५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.१७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,२८,६७६ व्यक्ती होमक्वारंटाइन, तर ४,५१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

* राज्यातील रुग्णनिदानाचा आलेख चढताच

६ मार्च - १० हजार १८७

५ मार्च - १० हजार २१६

४ मार्च - ८ हजार ९९८

३ मार्च - ९ हजार ८५५

* मुंबईत १ हजार १८८ नवे रुग्ण

मुंबईत शनिवारी १ हजार १८८ रुग्ण आणि मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, शहर, उपनगरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख १९ हजार ८८८ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ४४६ झाला आहे. दिवसभरात १ हजार २५३ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ३ लाख ९ हजार ४३१ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला असून, रुग्ण दुपटीचा कालावधी २३७ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या १० हजार ३९८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या ३३ दिवसांत मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ३२३ दिवसांनी कमी झाला आहे. याचाच अर्थ मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण वाढत आहे. मुंबईत १ फेब्रुवारीला ५ हजार ६५६ इतके सक्रिय रुग्ण होते. १ मार्च रोजी ९ हजार ६९०, तर ५ मार्चला १० हजार ४६९ सक्रिय रुग्ण आढळले. गेल्या ३३ दिवसांत मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ८०३ ने वाढली आहे.

......................