मुंबईत बसणार ७ लाखांहून अधिक विजेचे स्मार्ट मीटर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 02:06 AM2020-07-06T02:06:57+5:302020-07-06T02:08:03+5:30

अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड येत्या काही महिन्यांत ७ लाखांहून अधिक स्मार्ट मीटर्स बसवणार आहे. ग्राहकांना त्यांच्या वीजवापराविषयी रिअल-टाइम माहिती मिळत राहील.

More than 7 lakh electricity smart meters to be installed in Mumbai | मुंबईत बसणार ७ लाखांहून अधिक विजेचे स्मार्ट मीटर्स

मुंबईत बसणार ७ लाखांहून अधिक विजेचे स्मार्ट मीटर्स

Next

मुंबई : आॅटोमेटेड मीटर रीडिंगसाठी स्मार्ट मीटर्स बसवण्याकरिता वीज नियामक आयोगाने भांडवली खर्चाच्या योजनांना मंजुरी दिली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड येत्या काही महिन्यांत ७ लाखांहून अधिक स्मार्ट मीटर्स बसवणार आहे. ग्राहकांना त्यांच्या वीजवापराविषयी रिअल-टाइम माहिती मिळत राहील. मानवी हस्तक्षेपाशिवाय मीटर वाचन होऊ शकेल. राज्य सरकार व नियामक यंत्रणेने जारी केलेल्या निर्देशांनुसार वीज कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. त्यानुसार त्यांनी इंटरआॅक्टिव ई-बिल सुविधा, डिजिटल पेमेंटचे अनेक मार्ग, ग्राहकांच्या सोयीसाठी हप्त्यांमध्ये (ईएमआय) बिल भरण्याची सवलत, अशी अनेक पावले उचलून ग्राहकांच्या समस्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ग्राहक वेबसाइटला भेट देऊन त्यांची बिले स्वत: तपासून बघू शकतात. वापरलेली अचूक एकके (युनिट्स), टेरिफ दर, उपलब्ध टेरिफ स्लॅब लाभ या निकषांवर ते त्यांचे बिल कसे तयार करण्यात आले आहे? हे समजून घेऊ शकतात. गेल्या वर्षातील या कालखंडादरम्यानची तुलनाही बिलावर उपलब्ध आहे. ग्राहक त्यांचे तपशील भरून वेबसाइटवर त्यांची बिले स्वत: तपासू शकतात, बिलावरील मीटर वाचन, वीजवापर व देय रक्कम पडताळून बघू शकतात. त्यांच्या शंकांचे निरसन जलदगतीने होऊ शकते. वर्तमान मीटर वाचन बिलावर नमूद मीटर वाचनाहून अधिक असेल, तर बिल अचूक आहे. ग्राहकांना प्राप्त होणाऱ्या बिलांवर वर्तमान मीटर वाचन, एकूण देय रक्कम आणि मार्च व एप्रिल महिन्यांतील दुरुस्त्यांचे तपशील दिलेले आहेत. बिलातील दुरुस्त्यांबाबतचे तपशील तपासण्यासाठी ग्राहक संकेतस्थळाचा आधार घेऊ शकतात.

८ ग्राहकसेवा केंद्रांवर २५हून अधिक हेल्प डेस्क स्थापन करण्यात आले आहेत. ग्राहक त्यांच्या शंकांचे निरसन करून घेण्यासाठी सर्व केंद्रांवरील व्हिडीओ कॉल सुविधेचा लाभ घेऊ शकतात. क्रेडिट कार्डाद्वारे बिल भरण्यासाठी वेबसाइटवर ईएमआय सुविधा उपलब्ध आहे. पर्यायी पेमेंट पद्धती वापरणारे पात्र ग्राहकही एमईआरसीच्या पुरवठा नियमांनुसार ३ महिन्यांच्या हप्त्याची सुविधा उपलब्ध करून घेऊ शकतात. ग्राहकांच्या शंकांचे पूर्ण निरसन होत नाही, तोवर कोणतीही वीजजोडणी बिल न भरले गेल्याच्या कारणावरून खंडित केली जाणार नाही, अशी माहिती अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडकडून देण्यात आली.

Web Title: More than 7 lakh electricity smart meters to be installed in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.