Join us  

महाचित्रकला स्पर्धेत 60 हजारांहून अधिक चित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 3:46 PM

विजेत्यांचा गौरव; लोकमत आणि स्टार प्रवाहचा गणेशोत्सवानिमित्त उपक्रम

विद्यार्थ्यांमधील चित्रकलेस आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी यावर्षी लोकमत आणि स्टार प्रवाह यांच्या वतीने जय देवा श्री गणेशा महाचित्रकाला स्पर्धेत ६०,००० हून जास्त चित्र मिळाली. चित्रकला आणि मूर्ती कार्यशाळा आयोजित करून सर्वांना मार्गदर्शन दिले. विजेत्यांची चित्रे स्टार प्रवाहच्या वाहिनीवर दाखवण्यात आली आणि विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देउन गौरवण्यात आले. 

गणपती उत्सव म्हणजे वेगवेळ्या प्रकारचे मोदक. असेच चविष्ट मोदक सुप्रसिद्ध विष्णू मनोहरजींनी एल जी मायक्रोवेव मध्ये करून दाखवले. तसेच विदर्भातील गोड डाळ, स्वादिष्ट मसाले भात इतर पदार्थ सुद्धा लाईव्ह करून दाखवले. ह्या कार्यक्रमात एलजी ने वॉटर प्युरिफायर चे प्रात्यक्षिक दाखवून दूषित पाणी काढून गरम आणि थंड पाणी फिल्टर करतो. ह्या चविष्ट कार्यक्रमात आपल्या सोबत होत्या प्रसिद्ध अभिनेत्री अदिती सारंधर आणि मयुरी वाघ. ह्यांनी आपल्याला त्यांचा गणेश उत्सव कसा साजरा झाला तेही सांगितले. सर्वांचा लाडका अभिनेता यशोमान आपटेच्या गाण्याने कार्यक्रमात सर्वाना मंत्रमुग्ध केले.

लोकमतच्या ‘ती’चा गणपती सेल्फी स्पर्धा प्रस्तुत एलजी मध्ये, महिलांनी केलेल्या पूजा, आरती आणि अनेक विधींच्या सेल्फी स्पर्धेत महाराष्ट्राने भरभरून प्रतिसाद दिला. आनंद द्विगुणित करण्यासाठी लोकमत सखीमंच च्या सखींना एलजी कडून ३० सप्टेंबर पर्यंत त्यांच्या प्रत्येक उत्पादनांवर डिस्काउंट ऑफर दिली आहे. लवकरात लवकर जवळच्या दुकानात जाउन सखींनी आपले ओळखपत्र दाखवून याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ८१०८४६९४०७ या क्रमांकावर फक्त व्हाट्स अँप करा 

शेफ विष्णु मनोहरजींच्या खमंग रेसिपीचे पुन्हा प्रक्षेपण पाहण्यासाठी यावर क्लिक करा.  

टॅग्स :गणेशोत्सवचित्रकला