...हा तर मोदी सरकारचा जनतेच्या खिशावर दरोडा , बाळासाहेब थोरात यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 07:51 PM2020-06-29T19:51:48+5:302020-06-29T19:53:47+5:30

सध्या कच्च्या तेलाची किंमत २५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली येऊनही पेट्रोल डिझेल हे प्रति लिटर ९० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. मोदी सरकार इंधनाची दरवाढ करून नफेखोरी करत आहे

Modi government's robbery on people's pockets by raising fuel prices, the criticism of Balasaheb Thorat | ...हा तर मोदी सरकारचा जनतेच्या खिशावर दरोडा , बाळासाहेब थोरात यांची टीका

...हा तर मोदी सरकारचा जनतेच्या खिशावर दरोडा , बाळासाहेब थोरात यांची टीका

Next

 मुंबई - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटातून जात असताना गरीब, कामगार, मध्यवर्गीय, छोटे व्यावसायिक यांच्या पाठीशी केंद्र सरकारने भक्कमपणे उभे राहून त्यांना आधार देण्याची गरज आहे.  राहुल गांधी यांनी मागणी केल्याप्रमाणे ‘न्याय’ योजना राबवून लोकांना आर्थिक पाठबळ देण्याची ही वेळ असताना मोदी सरकार मात्र इंधनाची दररोज भाववाढ करुन जनतेच्या खिशावर दरोडा टाकत आहे, असा घणाघाती हल्ला  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज राज्यव्यापी धरणे आंदोलन पुकारले होते. पुण्यातील अलका टॉकीज चौकात झालेल्या धरणे आंदोलनात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सहभाग घेतला.यावेळी बोलताना ते म्हणाले,  डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात कच्च्या तेलाची किंमत १२५ डॉलरवर असतानाही देशांतर्गत इंधनाचे भाव स्थिर ठेवण्यात त्यांनी यश मिळवले परंतु सध्या कच्च्या तेलाची किंमत २५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली येऊनही पेट्रोल डिझेल हे प्रति लिटर ९० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. मोदी सरकार इंधनाची दरवाढ करून नफेखोरी करत आहे,   हा लोकांच्या खिशावर टाकलेला दरोडाच आहे. अगोदरच महागाईने गोरगरिब, सामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले आहे, मध्यवर्गीयांचे देखील कंबरडे मोडले आहे. छोटे व्यावसायीकही इंधन दरवाढीमुळे मेटाकुटीस आले आहेत. ही अन्यायी, जुलमी इंधन दरवाढ केंद्र सरकारने तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी थोरात यांनी केली. 

राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी काँग्रेस पक्षातर्फे धरणे आंदोलन करुन मोदी सरकार विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलनानंतर राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. या धरणे आंदोलनाबरोबर आज सोशल मीडियाच्या माध्यमातून SpeakUpForFuelHike ही ऑनलाईन मोहिमही राबवण्यात आली. या मोहिमेला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला, तरूण वर्ग मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाला. उद्या ३० जूनपासून आंदोलनाचा दुसरा टप्पा, राज्यातील सर्व तालुका मुख्यालयी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र सरकार जोपर्यंत ही अन्यायकारक दरवाढ मागे घेत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील असे काँग्रेस थोरात पुढे म्हणाले.
 

Web Title: Modi government's robbery on people's pockets by raising fuel prices, the criticism of Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.