Join us  

‘बॉम्बे हाउस’ला देणार आधुनिक रूप, लवकरच होणार नूतनीकरण, टाटा समूहाची कार्यालये हलवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 5:17 AM

‘बॉम्बे हाउस’ किंवा ‘टाटा हाउस’ ही मुंबईची किंवा उद्योग जगताची विशेष ओळख. १९२४ पासून देशाच्या आर्थिक, औद्योगिक विकासात कार्यरत असलेली ही इमारत आता टाटांनी सोडली आहे.

मुंबई : ‘बॉम्बे हाउस’ किंवा ‘टाटा हाउस’ ही मुंबईची किंवा उद्योग जगताची विशेष ओळख. १९२४ पासून देशाच्या आर्थिक, औद्योगिक विकासात कार्यरत असलेली ही इमारत आता टाटांनी सोडली आहे. समूहाच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त (१५० व्या) नूतनीकरणासाठी ९३ वर्षांनी पहिल्यांदाच टाटांचे मुख्यालय या इमारतीतून हलले आहे.पोलादापासून सुरुवात होऊन आॅटो, वस्त्रोद्योग, टेलिकॉम, आयटी, ऊर्जा, रसायने अशा विविधक्षेत्रांत कार्य असलेल्या टाटासमूहाचे मुख्यालय बॉम्बे हाऊसमध्ये होते.बॉम्बे हाऊस ही दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील जगप्रसिद्ध इमारत. टाटांच्या चार पिढ्या अनुभवणारी ही इमारत रिकामी होत आहे. त्याला अधिक आधुनिक रूप दिले जाणार आहे.नूतनीकरणासाठी इमारतील टाटाच्या विविध कंपन्यांची कार्यालये व विविध विभाग फोर्ट हाउसला हलविले आहेत.वारसा राहणार अबाधितहेरिटेज अर्थात वारसा यादीत असल्याने या इमारतीच्या बाहेरील अंग व मुख्य वास्तूला जराही धक्का न लावता उर्वरित अंतर्गत वास्तूचे नूतनीकरण केले जाईल. अंतर्गत वास्तू सध्याच्या उद्योग गरजांनुसार अधिक आधुनिक असेल, असे टाटा समूहाकडून ‘लोकमत’ला कळविण्यात आले आहे.या वास्तूचा इतिहासदक्षिण मुंबईत असलेले ‘बॉम्बे हाउस’ हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे ज्येष्ठ सुपुत्र दोराबजी टाटा यांनी उभे केले.१९२१ मध्ये मुंबई पालिकेकडून ही२१,२८५ चौरस मीटर जागा3.60कोटी रुपयांनाखरेदी केली.हे हाऊस १९२४ मध्ये उभारण्यात आले. तोपर्यंत टाटा समूहाचे कार्यालय नवसारी चेंबर्समध्ये होते.

टॅग्स :मुंबई