मुंबई : ताडदेव येथील एका मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातून विद्यार्थ्याचा मोबाइल चोरी झाल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून ते अधिक तपास करीत आहेत.
.....................................
पूर्वीच्या भांडणातून हत्येचा प्रयत्न
मुंबई : पूर्वीच्या भांडणातून रिक्षाचालक शैलेश रहाटे (२३) यांचा दुचाकीवरून पाठलाग करून त्यांच्यावर चाकूने हल्ला चढविल्याची घटना मंगळवारी रात्री १२ वाजता घडली. ते रिक्षा चालवत असताना भटवाडी परिसरात ही घटना घडली. यात त्यांच्या पोटावर, छातीवर, हात-पायावर चाकूने वार करण्यात आले. या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
.........................................
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची फसवणूक
मुंबई : पोलीस असल्याची बतावणी करून प्रभादेवी येथे राहणाऱ्या अरविंद शहा या वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी आणि अंगठी काढून घेऊन त्यांची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
................................
ओएलएक्सवरून फसवणूक; तपास सुरू
मुंबई : ओएलएक्सवर विक्रीसाठी ठेवलेला एसी विकत घेण्याच्या नावाखाली शिवाजी नगर येथील रहिवाशाची १२ हजार रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. सोमवारी या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी राजू शर्मा नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करीत अधिक तपास सुरू केला आहे.
.........................