Join us  

यापुढे मनसेत गटबाजीचे राजकारण खपवून घेणार नाही, राज ठाकरेंचा नवनियुक्त पदाधिका-यांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 2:55 AM

लागोपाठच्या पराभवानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नव्याने पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात केली आहे. पक्षात स्थानिक पदाधिका-यांपासून ते नेत्यांपर्यंत गटबाजी आहे.

मुंबई : लागोपाठच्या पराभवानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नव्याने पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात केली आहे. पक्षात स्थानिक पदाधिका-यांपासून ते नेत्यांपर्यंत गटबाजी आहे. यापुढे मनसेत गटबाजीचे राजकारण खपवून घेणार नाही, असा इशारा राज यांनी नवनियुक्त पदाधिका-यांना दिला.माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात मनसेच्या नवनियुक्त पदाधिकाºयांचा मेळावा सोमवारी पार पडला. या वेळी बोलताना राज ठाकरे यांनी मनसेतील गटबाजी रोखण्याचे आवाहन केले. यापुढे पक्षातील प्रत्येकासाठी कामाची आचारसंहिता असेल, त्याप्रमाणेच काम झाले पाहिजे. मनसेतील गटबाजीचे राजकारण थांबले पाहिजे, असा इशारा राज यांनी नव्या पदाधिकाºयांना दिला.एकापाठोपाठ एक पराभवआणि पक्षांतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबईत विभागवार बैठकांचा सपाटा लावला होता. मुंबईतील बैठकांमध्येस्थानिक पदाधिकाºयांपासून ते थेट नेते पदावर असणाºयांपर्यंत गटबाजी आढळल्याचे राज यांनी या वेळी सांगितले.‘यापुढे कार्यकर्ते आणि पदाधिकाºयांसाठी कामाबाबत निश्चित यंत्रणा असेल, तुम्हाला मला आता फसविता येणार नाही. मध्यंतरी मी पक्षाच्या नेत्यांना दूर केले, अशा बातम्या आल्या, पण पक्षात कुणाला ठेवायचे, कुणाला काढायचे, हा माझा अधिकार आहे,’ अशा शब्दांत राज यांनी नाराजांना फटकारल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :राज ठाकरेमहाराष्ट्र नवनिर्माण सेना