अयोध्या दौऱ्यावरून मनसे-राष्ट्रवादीत कुस्ती, शिवसेनाही फोटो वॉरमध्ये सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 09:04 AM2022-05-25T09:04:51+5:302022-05-25T09:05:16+5:30

फोटो शेअर करत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

MNS-NCP wrestling from Ayodhya tour, Shiv Sena also participates in photo war | अयोध्या दौऱ्यावरून मनसे-राष्ट्रवादीत कुस्ती, शिवसेनाही फोटो वॉरमध्ये सहभागी

अयोध्या दौऱ्यावरून मनसे-राष्ट्रवादीत कुस्ती, शिवसेनाही फोटो वॉरमध्ये सहभागी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रद्द झालेल्या अयोध्या दौऱ्यावरून सध्या मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या फ्री-स्टाइल कुस्तीचा डाव रंगला आहे. मंगळवारी दिवसभर दोन्ही पक्षांकडून विविध फोटो शेअर करत एकमेकांना कात्रीत पकडण्याचे प्रयत्न सुरू होते. सायंकाळी तर शिवसेनाही फोटो वॉरमध्ये सहभागी झाली.

भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण सिंह यांनी राज यांच्या अयोध्या दौऱ्याला टोकाचा विरोध करण्याची भूमिका घेत वातावरण तापविले होते. राजकीय वातावरण तापल्यानंतर दौऱ्याच्या निमित्ताने सापळा रचला गेला होता, असे सांगत राज यांनी हा दौराच रद्द करण्याची घोषणा केली; पण नेमका कुणाचा सापळा याचे स्पष्ट उत्तर राज यांनी पुण्यातील भाषणात दिले नव्हते. अखेर मंगळवारी सकाळी मनसे सचिव आणि राज ठाकरे यांचे निकटवर्तीय सचिन मोरे यांनी बृजभूषण सिंह यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खा. सुप्रिया सुळे यांच्या सोबतचा फोटोच सोशल मीडियावर शेअर केला. शिवाय, ‘काही फोटो चांगलेही असतात आणि खरेही असतात’, असा मथळा देत राज यांच्याविरोधातील सापळ्याचे सूत्रधार राष्ट्रवादी आणि पवारच असल्याचे सूचित केले. तर मनसेच्या गजानन काळे यांनी ‘ब्रिज-चे निर्माते, सुज्ञास अधिक सांगणे न लगे, असे सांगत आणखी फोटो शेअर केले. संदीप देशपांडे यांनीही राष्ट्रवादीवर आरोप केला. 

  राज यांच्या अयोध्या दौऱ्याविरोधातील सापळा शरद पवारांनीच लावल्याचा आरोप मनसेच्या नेत्यांनी दिवसभर लावून धरला. त्यासाठी कुस्तीच्या स्पर्धेचे पवार - बृजभूषण यांचे फोटो शेअर करण्याचा सपाटा लावला. त्यावर राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी पवार आणि राज यांचा फोटो शेअर करत पलटवार केला. आधारवड असा मथळा देत मनसेवर निशाणा साधला. 

Web Title: MNS-NCP wrestling from Ayodhya tour, Shiv Sena also participates in photo war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.