दादर मार्केटमधील हत्येनंतर मुजोर फेरीवाल्यांविरोधात मनसे पुन्हा आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 02:28 PM2019-06-28T14:28:59+5:302019-06-28T14:30:32+5:30

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी मनसेचा जी - उत्तर कार्यालयावर मोर्चा

MNS again aggressive against illegal hawkers after the murder in Dadar market | दादर मार्केटमधील हत्येनंतर मुजोर फेरीवाल्यांविरोधात मनसे पुन्हा आक्रमक

दादर मार्केटमधील हत्येनंतर मुजोर फेरीवाल्यांविरोधात मनसे पुन्हा आक्रमक

ठळक मुद्देसोमवारी सोहनीलाल नामक परप्रांतीय फेरीवाल्यांनी रागाच्या भरात एका ग्राहकाचा खून केला होता मुजोर फेरीवाल्यांविरोधात मनसेनी दादरच्या पालिकेच्या जी - उत्तर कार्यालावर मोर्चा काढला

मुंबई -  गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या फेरीवाल्यांमुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली असून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी मुजोर फेरीवाल्यांविरोधात मनसेनी दादरच्या पालिकेच्या जी - उत्तर कार्यालावर मोर्चा काढला असून गेल्या सोमवारी सोहनीलाल नामक परप्रांतीय फेरीवाल्यांनी रागाच्या भरात एका ग्राहकाचा खून केला होता अशा मुजोर फेरीवाल्यांवर कारवाई व्हावी यासाठी मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली  आज पालिकेच्या जी - उत्तर कार्यालावर मोर्चा काढण्यात आला.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या परप्रांतीय फेरीवाले रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर क्षेत्राच्या आत बसत आहे मुंबईतील अशा सर्व मुजोर व नियम मोडणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन मनसेने पालिका प्रशासन व पोलिसांना दिले. तीन पिढ्यांपासून फेरीवाल्यांचा व्यवसाय करणारे वेगळे लोक आहेत त्यांच्याव्यतिरिक्त बाहेरून आलेले युपी, बिहारी व बांगलादेशी परप्रांतीय आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांमध्ये गेल्या पाच वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे.

खून करण्याइतपत त्यांची मजल जाते हि मुगरूमी त्यांच्यात आली कुठून पोलिसांची भीती त्यांना राहिलेली नाही का याकडे पालिका प्रशासन व पोलिसांनी गांभीर्याने पहिले पाहिजे. दादर स्थानकाबाहेर कविवर्य केशवसुत उड्डाणपुलाखाली गर्दुल्ले आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या फेरीवाल्यांविरोधात पालिकेने व पोलिसांनी जाचक निर्बंध लावून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत येत्या 15 दिवसांत अशा फेरीवाल्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल कारवाई झाल्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल असे आश्वासन जी - उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी दिले असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.





 

Web Title: MNS again aggressive against illegal hawkers after the murder in Dadar market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.