बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये MMRDA चा पूल कोसळला; १४ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 09:33 AM2021-09-17T09:33:40+5:302021-09-17T09:34:11+5:30

Bandra Kurla Complex : ही घटना सकाळी चारच्या सुमारास घडली. या घटनेत १४ जण जखमी झाले आहेत. जखमींना व्ही.एन. देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

MMRDA bridge collapses in Bandra-Kurla complex; 14 injured | बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये MMRDA चा पूल कोसळला; १४ जण जखमी

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये MMRDA चा पूल कोसळला; १४ जण जखमी

googlenewsNext

मुंबई : मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ( BKC) ट्रेड सेंटरजवळ बांधल्या जाणाऱ्या उड्डाणपूलाचा काहीसा भाग आज पहाटेच्या सुमारास कोसळला. ही घटना सकाळी चारच्या सुमारास घडली. या घटनेत १४ जण जखमी झाले आहेत. जखमींना व्ही.एन. देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी पुलावर २० ते २५ मजूर काम करत होते. (A total of 14 persons are injured after a part of a bridge collapsed in Bandra Kurla Complex, Bandra East)

या उड्डाणपूलाचा प्रोजेक्ट MMRDA चा आहे. या पुलाच्या माध्यमातून SCLR ला बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सला जोडण्यात येत आहे. दरम्यान, पुलाचे काम सुरु होते. त्यावेळी पुलाचा भाग कोसळला. पूल कोसळला त्यावेळी काही कामगारांनी घाबरुन पाण्याच्या टाकीत उडी मारली, तर काहींनी पुलाला असलेल्या सळईला पकडून लटकले. तर या घटनेत १४ जण जखमी झाले आहेत. जखमींना व्ही.एन. देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. तसेच, पुलाच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकल्याची शक्यता नाही आहे, असे आपत्कालीन विभागाने सांगितले आहे.

जखमी व्यक्तींची नावे
१)अनिल सिंह (२८), 
२)अरविंद सिंह (२९)
३) अझर अली (२६)
४) मुस्तफ अली (२८)
५) रियाझुद्दीन (२३)
६)मोताब अली (२८)
७) रियाझु अली (२१)
८)श्रावण (४९)
९)अतिश (२२)
१०) अली (२२)
११)एझाझ-उल-हक (२९)
१२) परवेझ (२२) 
१३) अकबर अली (२५) 
१४) श्रीमंत (२५)

Read in English

Web Title: MMRDA bridge collapses in Bandra-Kurla complex; 14 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.