मोठी बातमी! महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, लोकलच्या फेऱ्या कमी होणार; मंत्री वडेट्टीवारांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 04:05 PM2021-02-26T16:05:46+5:302021-02-26T16:06:55+5:30

महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी मोठं विधान केलं आहे

minister vijay wadettiwar statement on maharashtra lockdown and mumbai local due to corona outbreak | मोठी बातमी! महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, लोकलच्या फेऱ्या कमी होणार; मंत्री वडेट्टीवारांचं विधान

मोठी बातमी! महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, लोकलच्या फेऱ्या कमी होणार; मंत्री वडेट्टीवारांचं विधान

Next

Corona In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. तसंच मुंबईलोकलच्या फेऱ्या देखील कमी करण्याचा विचार सुरू आहे, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत. 

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून ८ हजारांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील जनतेशी संवाद साधून कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली होती. तसचे ८ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतरही रुग्णसंख्या काही कमी होत नसल्यामुळे राज्यशासन लवकरच मोठा निर्णय घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

"राज्यातील एकूण वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. सरकारकडून सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. त्याजरी सुरू असल्या तरी त्याचा रिझल्ट काय होईल हे काही सांगता येण्यासारखं नाही. त्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे असं निश्चितच आपल्याला म्हणता येईल", असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. 

मुंबईलोकलच्या फेऱ्या कमी करणार
राज्यातील काही शहरांमध्ये कडक निर्बंध करावे लागली, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे. विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर आहे. त्यासोबतच मुंबईतही कोरोनाची स्थिती गंभीर होत जात आहे. गर्दी टाळण्यासाठी मुंबईतील लोकल सेवेच्या फेऱ्या कमी करण्याचा विचार सुरू आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. मुंबईच्या लोकलमधील गर्दी कशी कमी करता येईल याबाबतही विचार सुरू असल्याचं ते पुढे म्हणाले. 

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मंगल कार्यालयांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच येथील सिनेमागृह बंद करण्याचाही विचार सुरू असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. 
 

Web Title: minister vijay wadettiwar statement on maharashtra lockdown and mumbai local due to corona outbreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.