Join us

मुंबईत गारठा; किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:27 IST

मुंबई : जानेवारी महिना संपत असतानाच मुंबईच्या किमान तापमानाचा पारा चांगलाच खाली उतरला आहे. गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १५.२ ...

मुंबई : जानेवारी महिना संपत असतानाच मुंबईच्या किमान तापमानाचा पारा चांगलाच खाली उतरला आहे. गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १५.२ अंश एवढे नोंदविण्यात आले असून, घटत्या किमान तापमानामुळे मुंबईत गारठा आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २८ जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्र आणि लगतच्या परिसरातील किमान तापमानात पुन्हा एकदा घट नोंदविण्यात आली. जळगाव, नाशिक, पुणे, बारामती, डहाणू, सांताक्रुझ, ठाणे, सातारा, महाबळेश्वर, जेऊर आणि औरंगाबाद येथील किमान तापमान १५ अंशांखाली नोंदविण्यात आले आहे. पुढील २४ तास किमान तापमान खालीच राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जानेवारीच्या सुरुवातीला मुंबईच्या हवामानात बदल झाले होते. येथील तापमानात किंचित वाढ झाली होती. शिवाय वायुप्रदूषणही कमालीचे वाढले होते. कालांतराने प्रदूषण किंचित घटले असले तरी त्याचे प्रमाण कायम आहे. दुसरीकडे, किमान तापमानात घसरण झाल्याने मुंबईकरांना किंचित दिलासा मिळाला.

........................