Join us

मेट्रो- ३ चे किमान भाडे ११ रुपये!

By admin | Updated: February 15, 2015 01:05 IST

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या नियोजित पुर्णपणे भुयारी मेट्रो-३ चे पुर्तता होण्यास २०२० साल उजाडावे लागणार असले तरी त्यावेळचे तिकीट भाडे सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणारे असणार आहे.

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या नियोजित पुर्णपणे भुयारी मेट्रो-३ चे पुर्तता होण्यास २०२० साल उजाडावे लागणार असले तरी त्यावेळचे तिकीट भाडे सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणारे असणार आहे. किमान भाडे ११ तर कमाल भाडे ३६ रुपये असणार असून मेट्रो-१च्या तुलनेत स्वस्त असणार आहे. हा प्रकल्प मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे राबविण्यात येणार असल्याने दराचा भूर्दड प्रवास्यांवर टाकला जाणार नाही, असे महामंडळाकडून सांगण्यात आले.वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोचे भाडे १०, २०, ३० आणि ४० रुपये आहे. दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोच्या तुलनेत मुंबई मेट्रोचे भाडे अधिक आहे. आणि मुंबई मेट्रोचे दर प्रवाशांना दिलासा देणारे असावेत, म्हणून राज्य सरकारने सध्या तरी उल्लेखनीय पावले उचललेली नाहीत. मेट्रो कायद्यानुसार दरनिश्चिती समिती ही मेट्रोचे दर ठरविते आणि मेट्रो-३ हा प्रकल्प स्वत: राज्य सरकार म्हणजे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच राबविणार आहे. परिणामी मेट्रो-३ चे दर माफक ठेवण्यावर सरकारचा भर आहे. मेट्रो-३ प्रकल्पाचे काम २०१६ साली सुरू होणार असून, २०२० साली हे काम पूर्ण होणार आहे. आणि प्रत्यक्षात जेव्हा भुयारी मेट्रो धावू लागेल तेव्हा त्यातून दररोज १४ लाख प्रवासी प्रवास करतील. शिवाय २०३० साली भुयारी मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या १७ लाखांवर पोहोचेल. शिवाय रस्त्यांवरील ३५ टक्के वाहतूककोंडी कमी होईल आणि प्रवाशांचा वेळ वाचेल, असा त्यांचा दावा आहे. (प्रतिनिधी)कफपरेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर मेट्रो, शितला देवी मंदिर, धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रूझ, छत्रपती शिवाजी विमानतळ (राष्ट्रीय), सहार रोड, छत्रपती शिवाजी विमानतळ (आंतरराष्ट्रीय), मरोळ नाका, एमआयडीसी, सीप्झ आणि आरे कॉलनी.च्कुलाबा-सीप्झ मेट्रोमध्ये २७ स्थानके असतील. त्यापैकी २६ स्थानके भुयारी असतील.च्आरे कॉलनी स्थानक जमिनीवर असेल. भुयारी स्थानके १५ ते २५ मीटर खोल असतील.च्बांधकाम सात भागांत विभागले जाईल आणि १४ विविध ठिकाणी बांधकामाची सुरुवात होईल.च्भुयारी मेट्रोला अद्ययावत तंत्रज्ञानच्बोगद्याच्या भागासाठी टनेल बोरिंग मशिन वापरले जाईल.च्बांधकामासाठी कट अ‍ॅण्ड कव्हर पद्धत वापरली जाईल.