Join us  

बँकेच्या लॉकरमधून लाखोंचे दागिने गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 4:38 AM

मुंबई : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या माटुंगा शाखेतील ५७ वर्षीय महिलेच्या लॉकरमधून दोन लाखांचे दागिने गायब झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

मुंबई : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या माटुंगा शाखेतील ५७ वर्षीय महिलेच्या लॉकरमधून दोन लाखांचे दागिने गायब झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ही बाब महिलेला समजताच त्यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून माटुंगा पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.चेंबूरच्या पोस्टल कॉलनीत ५७ वर्षांच्या तक्रारदार आॅक्सिलिया सुरेश भास्करन मुलीसोबत राहतात. त्यांचे आणि त्यांच्या मुलीचे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या माटुंगा शाखेत संयुक्त खाते आहे. याच बँकेतील लॉकर क्रमांक एस ए-४२मध्ये त्यांनी किमती दागिने ठेवले होते. वर्षातून एकदा त्या बँकेत जात असत. सोमवारी त्यांना बँकेतून आलेल्या फोनमुळे त्या चक्रावल्या. त्यांचे लॉकर उघडे असल्याची माहिती बँकेकडून मिळाली. त्यांनी लॉकरकडे धाव घेतली तेव्हा लॉकरमधून दोन लाख ६५ हजार किमतीचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.घरातील दागिने सुरक्षित राहावेत म्हणून त्यांनी बँकेतील लॉकरमध्ये ते ठेवले होते. मात्र ते तेथूनच चोरी झाल्याने त्यांनाही धक्का बसला. त्यांनी माटुंगा पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला़

टॅग्स :मुंबईदरोडा