कोरोनाला धुडकावून सातासमुद्रापार येणार स्थलांतरित पक्षी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 02:52 AM2020-10-10T02:52:40+5:302020-10-10T02:53:46+5:30

भारतात स्थलांतरित होणाऱ्या प्रजाती सुमारे २३०; तर महाराष्ट्रात ६०; पक्ष्यांचा मुक्काम सहा महिने राहणार

Migratory birds comes to maharashtra | कोरोनाला धुडकावून सातासमुद्रापार येणार स्थलांतरित पक्षी

कोरोनाला धुडकावून सातासमुद्रापार येणार स्थलांतरित पक्षी

Next

- सचिन लुंगसे 

मुंबई : कोरोना महामारीच्या संकटाला धुडकावून उत्तर गोलार्धातील कडाक्याच्या थंडीपासून स्वत:चा जीव वाचविण्यासह अन्नाच्या शोधात स्थलांतरित पक्षी हिमालय ओलांडून आता महाराष्ट्रासह भारतात दाखल होणार आहेत. सैबेरिया, रशियासारख्या थंडीतून येथे दाखल होतानाच स्थलांतरित पक्ष्यांना हिमालयातून धोक्यांनादेखील सामोरे जावे लागणार असून, येथे स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम किमान सहा महिने राहील.

पृथ्वीवर ग्लोबल वॉर्मिंग वेगवेगळ्या पद्धतीने होत आहे. एकंदर दक्षिण गोलार्धाच्या तुलनेत उत्तर गोलार्धात अधिक थंडी असते किंवा जागतिक तापमान वाढीचे मोठे फटके बसतात. यापासून बचाव करण्यासाठी हे पक्षी मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे स्थलांतरित होतात. भारतात स्थलांतरित होणाऱ्या प्रजाती सुमारे २३०, तर महाराष्ट्रात ६० च्या आसपास आहेत.

स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाची काही महत्त्वाची ठिकाणे
नांदूर मधमेश्वर (नाशिक जिल्हा), हतनूर जलाशय (जळगाव जिल्हा), ठाणे खाडी (ठाणे जिल्हा), शिवडी समुद्रकिनारा (मुंबई), कोकणातील विविध समुद्रकिनारे उदा. अर्नाळा, वसई, मुंबईचा परिसर, उरण, अलिबाग, मुरूड, गंगापूर धरणाचा परिसर (नाशिक जिल्हा), जायकवाडी धरणाचा परिसर (अहमदनगर तथा औरंगाबाद), कोयना अभयारण्य (सातारा), कर्नाळा अभयारण्य (रायगड), नवेगाव धरणाचा प्रदेश (भंडारा आणि गोंदिया जिल्हा), तुंगारेश्वर अभयारण्य (ठाणे जिल्हा), तानसा अभयारण्य (ठाणे जिल्हा), सोलापूर जिल्ह्यातील अनेक धरणे, तलाव व बंधारे, उजनी धरणाचा प्रदेश (पुणे व सोलापूर जिल्हा).

ग्लोबल वॉर्मिंगमुळे सर्व स्थलांतरित पक्ष्यांच्या स्थलांतरामध्ये कमी-जास्त प्रमाणात फरक पडला आहे. आता हे प्रमाण किती वाढले, हे सांगता येत नाही. कारण आपल्याकडे असा अभ्यास झालेला नाही. असा अभ्यास व्हायला हवा. यासाठी सॅटेलाईट डिव्हाईसचा वापर केला तर नक्कीच स्थलांतरित पक्ष्यांचा मार्ग समजू शकेल.
- अविनाश कुबल, निसर्गतज्ज्ञ

स्थलांतरित पक्ष्यांना धोका
हिमालय पर्वत ओलांडताना पक्ष्यांना ऊर्जा लागते. याचवेळी मान्सून आणि वाºयाला तोंड द्यावे लागते.
शिकारी पक्ष्यांचे आक्रमण होऊ शकते.
छोटे पक्षी उंचावर जाऊ शकत नाहीत. त्या वेळी हिमालयाच्या दऱ्यांतून ते प्रवास करतात. तेव्हा थांब्यादरम्यान स्थानिकांकडून त्यांची शिकार होते.
येथील तलाव, नद्या, पाणथळ जागा प्रदूषित झाल्याने त्यांना अन्न मिळत नाही.
नागरीकरणामुळे पाणथळ जागा बुजविल्याने त्याचा फटका त्यांना बसतो.

Web Title: Migratory birds comes to maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.