Join us  

देसाईनजीक फुटली एमआयडीसीची जलवाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-शीळ रोडवरील देसाई गावानजीक एमआयडीसीची १८०० मिलीमीटर व्यासाची मोठी जलवाहिनी शनिवारी सायंकाळी साडेसहा ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण-शीळ रोडवरील देसाई गावानजीक एमआयडीसीची १८०० मिलीमीटर व्यासाची मोठी जलवाहिनी शनिवारी सायंकाळी साडेसहा ते पावणेसातच्या सुमारास फुटली. त्यामुळे या रस्त्याला अक्षरश: नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली. जलवाहिनी फुटल्याने दोन तास लाखो लीटर पाणी वाया गेले.

बदलापूर येथील बारवी धरणातील पाण्याचा पुरवठा या जलवाहिनीद्वारे एमआयडीसीकडून ठाणे, नवी मुंबई, कळवा, मुंब्रा आदी शहरांना केला जातो. ही जलवाहिनी सायंकाळी फुटल्यानंतर लाखो लीटर पाणी वाया गेले. या घटनेची माहिती मिळताच त्यातील पुरवठा बंद करण्यात आला. तसेच जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी एक पथक घटनास्थळी पोहोचले होते. मात्र ही दुरुस्ती नक्की केव्हा पूर्ण होईल आणि पाणीपुरवठा कधी सुरू होईल, याविषयीची अधिकृत माहिती एमआयडीसीच्या अधिकारी वर्गाकडून देण्यात आलेली नाही. दरम्यान, कल्याण-शीळ मार्गावर ही जलवाहिनी फुटण्याची ही अलीकडच्या काळातील तिसरी घटना आहे. वारंवार जलवाहिनी फुटत असल्याने तिची दुरुस्ती देखभाल योग्य प्रकारे केली जात नसल्याचा आरोप मनसेने यापूर्वीही केला होता.

फोटो आहे - ०९ कल्याण पाइपलाइन