आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी मायकेल पात्रा; आचार्य यांच्या राजीनाम्यामुळे नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 02:05 AM2020-01-15T02:05:03+5:302020-01-15T02:05:20+5:30

मायकेल पात्रा हे सध्या पतधोरण समिती सदस्य आहेत.

Michael Patra as Deputy Governor of RBI; Appointment due to Acharya's resignation | आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी मायकेल पात्रा; आचार्य यांच्या राजीनाम्यामुळे नियुक्ती

आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी मायकेल पात्रा; आचार्य यांच्या राजीनाम्यामुळे नियुक्ती

googlenewsNext

मुंबई : केंद्र सरकारने मायकेल देवव्रत पात्रा यांची रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे नवे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नेमणूक केली. आधीचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी मुदतीच्या सहा महिने आधी राजीनामा दिला होता. त्यामुळे तिथे पात्रा यांची नियुक्ती करण्यात आली. मायकेल पात्रा २३ जुलै रोजी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांची मुदत तीन वर्षे असेल.

मायकेल पात्रा हे सध्या पतधोरण समिती सदस्य आहेत. पतधोरणाच्या बैठकीत त्यांनी व्याजदरात कपातीची भूमिका घेतली होती. ते २00५पासून पतधोरण विभागात आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी केली आहे. ते १९८५ साली आरबीआयमध्ये रुजू झाले. त्यांनी आर्थिक स्थैर्य विषयावर हॉर्वर्ड विद्यापीठात संशोधनही केले आहे.

सरकारशी होते मतभेद
विरल आचार्य यांनी सरकारशी आर्थिक बाबींवरून मतभेद झाल्याने राजीनामा दिला. बँकेच्या स्वायत्ततेवर सरकार घाला घालत असल्याचा जाहीर आरोपही आचार्य यांनी केला होता.

Web Title: Michael Patra as Deputy Governor of RBI; Appointment due to Acharya's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.