Mhada will give home to Marathi artists | मराठी कलाकारांसाठी खूशखबर, म्हाडा देणार हक्काचं घर 
मराठी कलाकारांसाठी खूशखबर, म्हाडा देणार हक्काचं घर 

ठळक मुद्देमराठी कलाकारांना एमएमआर विभागात घरं देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. मुंबई महानगर विभागामध्ये घरं दिली जाणार असल्याची घोषणा म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी केली. म्हाडाच्या या निर्णयाचा मराठी कलाकारांना आणि तंत्रज्ञांना लाभ होणार आहे.

मुंबई - मराठी कलाकारांना एमएमआर विभागात घरं देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. मराठी कलाकारांना हक्काचं घर घेता यावं म्हणून एमएमआर म्हणजेच मुंबई महानगर विभागामध्ये घरं दिली जाणार असल्याची घोषणा म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी केली. म्हाडाच्या या निर्णयाचा मराठी कलाकारांना आणि तंत्रज्ञांना लाभ होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार सिनेमा आणि टिव्ही मालिका क्षेत्रात काम करणारे कलाकार आणि तंत्रज्ञांना आता म्हाडामार्फत स्वस्तात घरं उपलब्धं होणार आहेत. त्यासाठी शुक्रवारी (१२ जुलै) शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि सचिव आदेश बांदेकर यांनी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत कलाकार आणि तंत्रज्ञही उपस्थित होते. 

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या कलाकारांना त्यांच्या जिल्हा विभागातच म्हाडाची घरं उपलब्ध करण्यात येतील. तर मुंबई एमएमआर रिजनमध्ये काम करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांना विरारमध्ये म्हाडाची घरं उपलब्धं करण्यात येतील असं म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितलं आहे. आदेश बांदेकर यांनी या योजनेमुळे बँकस्टेज कलाकार आणि तंत्रज्ञांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं सांगितलं. या बैठकीला सरचिटणीस संग्राम शिर्के, सुशांत शेलार, दिगंबर नाईक, नितीन घाग, विद्या खटावकर, राणी गुणाजी आणि इतर कलाकार तसेच म्हाडाचे अधिकारी हजर होते.

खूशखबर! राज्यभरात म्हाडाच्या १४,६२१ घरांची लॉटरी लवकरच

राज्यामध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक जाहीर होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी राज्यातील विविध भागांतील सुमारे १४ हजार ६२१ घरांची सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत दिली. तसेच मुंबईतील घरांची लॉटरी यंदा नसेल. मात्र, मुंबईत गिरणी कामगारांसाठी लवकरच ५ हजार ९० घरांची लॉटरी काढण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

निवडणूक आचारसंहितेपूर्वी म्हाडाच्या कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद यासह गिरणी कामगारांच्या १४,६२१ घरांची सोडतीची जाहिरात ऑगस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. मंगळवारच्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. पुणे मंडळाच्या हद्दीतील २० टक्के कोट्यातील २ हजार घरे, कोकण मंडळाची ५,३०० घरे नाशिक मंडळाची ९२, औरंगाबाद १४८, अमरावती १२००, नागपूर ८९१ तर मुंबईमध्ये गिरणी कामगारांसाठी ५ हजार ९० अशा १४,६२१ घरांचा या सोडतीत समावेश आहे.
 

English summary :
MHADA has decided to give Marathi artists a home in MMR division. MHADA president Uday Samant has announced that homes will be provided in MMR ie Mumbai Metropolitan Region so that the Marathi artists can get their rightful occupation. This decision of MHADA will benefit Marathi artists and technicians.


Web Title: Mhada will give home to Marathi artists
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.