Join us

म्हाडा काढणार ५ हजार ३११ घरांची लॉटरी

By सचिन लुंगसे | Updated: December 8, 2023 19:17 IST

१५ सप्टेंबर रोजी लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रिया सुरू करण्यात आली.

मुंबई : म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या ५ हजार ३११ घरांची लॉटरी डिसेंबर महिन्याच्या शेवटी निघण्याची शक्यता आहे. लॉटरीसाठी एकूण ३० हजार ६८७ अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह २४ हजार ३०३ अर्ज प्राप्त झाले आहेत.

१५ सप्टेंबर रोजी लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रिया सुरू करण्यात आली. अर्जदारांच्या सोयीकरिता मुदतवाढ देण्यात आली. प्राप्त अर्जांची प्रारूप यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्वीकृत अर्जाची अंतिम यादी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. 

  • प्रधामंत्री आवास योजनेअंतर्गत १ हजार १० घरांचा समावेश आहे.
  • एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १ हजार ३७ घरांचा समावेश आहेत.
  • सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ९१९ घरे आहेत.
  • टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी ६७ घरे आहेत.
  • प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या योजने व्यतिरिक्त इतर सर्व योजनांकरिता २० टक्के  प्रतीक्षा यादी असणार आहे.
  • लॉटरीची नवीन दिनांक अर्जदारांना मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे.
  • प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करणार्‍या नागरिकांनी पी एम ए वाय योजने अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेली नसल्यास यशस्वी अर्जदारांनी नोंदणी करणे बंधनकारक राहील. कोंकण मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • १३ डिसेंबर रोजी लॉटरी निघणार होती. मात्र प्रशासकीय कारणास्तव ही लॉटरी पुढे ढकलण्यात आली आहे.

  

टॅग्स :मुंबईम्हाडा