Join us  

शैक्षणिक संस्थांना म्हाडाचा भूखंड

By admin | Published: December 01, 2015 4:01 AM

म्हाडाच्या कोकण मंडळाने विरार बोळींज येथील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेला आरक्षित असलेले दोन भूखंड वितरित करण्यासाठी नामांकित संस्थांकडून अर्ज मागविले आहेत.

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने विरार बोळींज येथील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेला आरक्षित असलेले दोन भूखंड वितरित करण्यासाठी नामांकित संस्थांकडून अर्ज मागविले आहेत. म्हाडाच्या अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या संस्थांना हे भूखंड वार्षिक एक रुपया भुईभाड्याप्रमाणे देण्यात येणार आहेत. राज्य शासनाने म्हाडाला गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यासाठी विरार बोळींज येथे देण्यात आलेल्या जमिनीवर म्हाडामार्फत यापूर्वीही घरे उभारण्यात आली असून, त्यांची लॉटरीही काढण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील घरांची लॉटरी जानेवारी महिन्यात काढण्यात येणार आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार, येथील भूखंड क्रमांक १४६ आणि १४७ हे अनुक्रमे उच्च माध्यमिक शाळा आणि प्राथमिक शाळेसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार, म्हाडाने हे भूखंड नामांकित संस्थांना वितरित करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. हे भूखंड वितरित करण्यासाठी म्हाडाने जाहिरात प्रसिद्ध केली असून, संस्थांना म्हाडा कार्यालयातील कोकण मंडळ कार्यालयात १५ दिवसांच्या आत अर्ज सादर करावा लागणार आहे. धर्मदाय कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्थांनीच अर्ज करणे बंधनकारक आहे, असे म्हाडाने नमूद केले आहे. त्याचप्रमाणे म्हाडा कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नव्याने सुरू होणाऱ्या शैक्षणिक संस्थेत २ टक्के जागा प्राधान्याने देणे, बंधनकारक असल्याची अट प्राधिकरणाने घातली आहे.