मेट्रोचा मार्ग बदलणार सिसर क्रॉसओव्हर चारकोपमध्ये बसवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 04:14 AM2020-06-29T04:14:39+5:302020-06-29T04:14:49+5:30

मेट्रो मार्ग-२ अमध्ये सिसर क्रॉसओव्हर निश्चित केलेल्या जागी जुलैपर्यंत लावण्यात येईल, आणि चारकोप आगारातील निश्चित केलेल्या प्लॅटफॉर्मवर उतरवलेले मेट्रोचे डबे हे स्टॅबलिंग लाइनच्या मदतीने हलवले जातील.

The Metro will be diverted and the Cesar crossover will be installed in Charkop | मेट्रोचा मार्ग बदलणार सिसर क्रॉसओव्हर चारकोपमध्ये बसवणार

मेट्रोचा मार्ग बदलणार सिसर क्रॉसओव्हर चारकोपमध्ये बसवणार

Next

मुंबई : मेट्रो मार्ग-२ अ या प्रकल्पासाठी सिसर क्रॉसओव्हर प्राप्त झाले आहे. ये-जा करणाऱ्या मेट्रो ट्रेनला मार्ग बदलण्यासाठीची सिसर क्रॉसओव्हर ही एक विशिष्ठ पद्धतीची मार्ग रचना असते. ही रचना आता चारकोप मेट्रो आगार येथे जाणाऱ्या उताराच्या भागात लावण्यात येईल, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली.

मेट्रो मार्ग-२ अमध्ये सिसर क्रॉसओव्हर निश्चित केलेल्या जागी जुलैपर्यंत लावण्यात येईल, आणि चारकोप आगारातील निश्चित केलेल्या प्लॅटफॉर्मवर उतरवलेले मेट्रोचे डबे हे स्टॅबलिंग लाइनच्या मदतीने हलवले जातील. सिसर क्रॉसओव्हर सोनिपत, हरियाणा येथे असलेल्या भारतीय कंपनीने केले आहे. सिसर क्रॉसओव्हर उत्पादनासाठी वापरले गेलेले विशिष्ठ रूळ हे वोइस्टलपाईन या ऑस्ट्रियन कंपनीकडून आयात केले गेले आहेत. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने २३ जून रोजी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) जंक्शन स्टेशन येथे अखेरच्या पाईल कॅपचे काम पूर्ण केले आहे. बांधकामादरम्यान जमिनीखाली असलेल्या असंख्य वाहिन्या जसे की, तब्बल ६०० मिमीच्या २ ऑपरेशन व्हॉल्व कीज, ३०० मिमीची महानगर गॅसलाइन, ४५० मिमीची मलवाहिनी आणि अशा अनेक विद्युत, फायबर आणि एमटीएनएल वाहिन्यांबद्दल माहिती मिळाली.

जमिनीखाली असलेल्या अनेक वाहिन्यांची माहिती मिळाल्यानंतर पाईल कॅप कशा प्रकारे बसवता येईल याचा अभ्यास करणे एमएमआरडीएला सोपे गेले. जमिनीच्या खोलवर जाऊन करण्याचे काम असल्यामुळे सर्वात मोठी जोखीम होती. तसेच जमिनीखालील अनेक वाहिन्या, कठीण खडके आणि जागेची कमतरता यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून खोदकाम करून मोठमोठ्या यंत्रांसह काम करणे खूप कठीण झाले होते. परंतु या सर्वांवर मात करत जेव्हीएलआर येथील पाईल कॅपचे काम आता पूर्ण झाले आहे.

एमएमआरडीएला गेले सोपे
जमिनीखाली असलेल्या अनेक वाहिन्यांची माहिती मिळाल्यानंतर पाईल कॅप कशा प्रकारे बसवता येईल याचा अभ्यास करणे एमएमआरडीएला सोपे गेले. त्यानंतर योग्य त्या खोलीसह पाईल कॅप बसवण्यात आली.

Web Title: The Metro will be diverted and the Cesar crossover will be installed in Charkop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो