मेट्रो-३ : २२ भुयारी टप्पे पूर्ण, विद्यानगरी ते विमानतळापर्यंत काम ओकेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 02:49 AM2019-11-03T02:49:50+5:302019-11-03T02:50:20+5:30

उरले फक्त १० टप्पे । विद्यानगरी ते विमानतळापर्यंत काम पूर्ण

Metro-1: 2 subway stages complete in mumbai metro | मेट्रो-३ : २२ भुयारी टप्पे पूर्ण, विद्यानगरी ते विमानतळापर्यंत काम ओकेच

मेट्रो-३ : २२ भुयारी टप्पे पूर्ण, विद्यानगरी ते विमानतळापर्यंत काम ओकेच

Next

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ च्या एकूण ३२ भुयारी टप्प्यांपैकी २२ वा भुयारी टप्पा शनिवारी पूर्ण करण्यात आला. गोदावरी २ या टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने पॅकेज सहामधील विद्यानगरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी १ या स्थानकादरम्यान डाऊन लाइनच्या दिशेने २.८ किलोमीटरचे अंतर २ हजार ४८ रिंग्जच्या मदतीने पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिली.

२२ आॅक्टोबर रोजी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने २१ वा भुयारी टप्पा पार केला होता. सूर्या २ या टनेल बोरिंग मशीनची यासाठी मदत घेण्यात आली. विधान भवन ते चर्चगेट या स्थानकांदरम्यान डाऊन लाइनच्या दिशेने ४८२ मीटर इतके अंतर ९० दिवसांत पूर्ण करण्यात आले होते. मेट्रो ३ चे ६५ टक्के भुयारीकरण १२ आॅक्टोबर रोजी पूर्ण करण्यात आले. धारावी येथे भुयारीकरणाचा २० वा टप्पा पार पडला. टनेल बोरिंग मशीन कृष्णा २ ची यासाठी मदत घेण्यात आली.
पॅकेज ४ मधील ४ था टप्पा पूर्ण करताना नया नगर ते धारावी स्थानकांदरम्यानचे ५९० मीटर भुयारीकरण १३० दिवसांत पूर्ण करण्यात आले. ३ आॅक्टोबर रोजी भुयारीकरणाचा १९ वा टप्पा पार करण्यात आला. यासाठी सूर्या १ ची मदत घेण्यात आली. विधान भवन ते चर्चगेट स्थानकांदरम्यानचे ४९९ मीटर भुयारीकरण तब्बल ९० दिवसांत पूर्ण करण्यात आले.
 

Web Title: Metro-1: 2 subway stages complete in mumbai metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.