Join us

मध्य, हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

By admin | Updated: October 23, 2014 23:42 IST

ब्लॉकमुळे लोकल वीस मिनिटे उशिराने धावणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. सीएसटीहून डाऊन जलद मार्गावरून जाणाऱ्या लोकल गाड्यांना घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकात थांबा देण्यात येणार आहे

मुंबई - सिग्नल, रूळ, ओव्हरहेड वायर आदीची दुरूस्ती आणि देखभाल यासाठी मध्य रेल्वेकडून २६ आॅक्टोबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर सकाळी साडेअकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे मुलुंड ते परेल दरम्यान अप जलद मार्गावरील लोकल अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. ब्लॉकमुळे लोकल वीस मिनिटे उशिराने धावणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. सीएसटीहून डाऊन जलद मार्गावरून जाणाऱ्या लोकल गाड्यांना घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हार्बर मार्गावर कुर्ला ते चुनाभट्टी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी सव्वाअकरा ते दुपारी सव्वातीन वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसटी ते पनवेल, बेलापूर, वाशी दरम्यानच्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉकवेळी कुर्ला ते पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. अप आणि डाऊन मार्गावरील चुनाभट्टी आणि जीटीबी स्थानक उपलब्ध राहणार नसल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)