Join us  

उद्या मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:34 AM

मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ दरम्यान मेगाब्लॉक घेतला जाईल.

मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नल प्रणाली तसेच इतर डागडुजीच्या कामांसाठी रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ दरम्यान मेगाब्लॉक घेतला जाईल. कल्याणवरून सुटणाऱ्या सर्व जलद गाड्या सकाळी १०.३७ ते ३.०६ दरम्यान दिवा ते परेल स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावरून धावतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी १०.०५ ते दुपारी ३.२२ पर्यंत सुटणाºया डाऊन जलद गाड्या नियोजित थांब्याशिवाय घाटकोपर, विक्रोळी,भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकावर थांबणार आहेत. तसेच आपल्या नियोजित वेळेपेक्षा २० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

सीएसएमटीवरून सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुटणाºया धिम्या गाड्या १० मिनिटे उशिराने धावणार आहेत. वडाळा आणि मानखुर्द स्थानकांदरम्यान सकाळी १०.४० ते दुपारी ४.१० या वेळेत मेगाब्लॉक घेतला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून पनवेल, बेलापूर, वाशीला सकाळी १०.०३ ते दुपारी ३.४४ पर्यंत सुटणाºया डाऊन दिशेकडील गाड्या तसेच सकाळी ९.४४ ते दुपारी ३.४७ पनवेल, बेलापूर, वाशीवरून सीएसएमटीसाठी सुटणाºया गाड्या रद्द केल्या आहेत़पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉकच्पश्चिम रेल्वेच्या वतीने रेल्वे रूळ, सिग्नल प्रणाली तसेच इतर डागडुजीच्या कामांकरिता शनिवार, दि. २५ मे आणि रविवार, दि. २६ मेदरम्यान मध्यरात्री ११.५५ ते ३.५५ या वेळेत अप आणि डाऊन जलद मार्गावर माटुंगा ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेतला जाईल.च्या काळात अप जलद मार्गावरील सर्व गाड्या सांताक्रुझ तसेच चर्चगेट स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावरून चालविल्या जातील.