Join us  

रेल्वेच्या तिन्‍हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक; ठाणे-नेरूळ विशेष सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:36 AM

रेल्वे रुळांची देखभाल, दुरुस्ती व अन्य कामांसाठी रविवारी पश्चिम मार्गावर अंधेरी-बोरीवलीदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई : रेल्वे रुळांची देखभाल, दुरुस्ती व अन्य कामांसाठी रविवारी पश्चिम मार्गावर अंधेरी-बोरीवलीदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे-कल्याण या धिम्या मार्गावर आणि हार्बरवरील नेरूळ-पनवेल अप आणि डाऊन मार्गावर साधारणपणे सकाळी ११ ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल.पश्चिम मार्गावरील अंधेरी-बोरीवली स्थानकांदरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे ब्लॉक काळातील वाहतूक अप आणि डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येईल. ब्लॉकसंबंधित विस्तृत माहिती पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवर देण्यात आली आहे.मध्य मार्गावर ठाणे-कल्याण धिम्या मार्गावर रविवारी सकाळी १०.४८ ते ४.२३ वाजेपर्यंत ब्लॉक कालावधीत कामे करण्यात येतील. ब्लॉक काळात वाहतूक डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येईल. यामुळे ब्लॉक काळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. प्रवाशांच्या सोयीसाठी दिवा, डोंबिवली, कल्याणमार्गे अप प्रवास करण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ब्लॉक काळात अप आणि डाऊन मार्गावरील जलद लोकलला नियमित थांब्यासह विशेष थांबा देण्यात येणार आहे. यामुळे सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत मध्य मार्गावरील लोकल १० मिनिटे उशिराने धावतील.ठाणे-नेरूळ विशेष सेवाहार्बर मार्गावरील नेरूळ-पनवेल मार्गादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ११.२० ते ४.२० या वेळेत ब्लॉक कामे होणार आहेत. ब्लॉक काळात नेरूळ-पनवेल/बेलापूर मार्गावरील सेवा खंडित करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नेरूळ आणि ठाणे-नेरूळ या मार्गावर विशेष फेºया चालवण्यात येतील.

टॅग्स :मध्ये रेल्वे