Mega Blocks on all three lines of trains tomorrow | रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

मुंबई : मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रूळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यानुसार मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड या कल्याण दिशेकडील जलद मार्गावर, तर पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते गोरेगाव दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रेच्या दोन्ही दिशेकडील मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान कल्याण दिशेकडील जलद मार्गावर सकाळी १० वाजून ३० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉक काळात माटुंगा ते मुलुंड दरम्यान कल्याण दिशेकडील जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर चालविण्यात येतील. हार्बर्रवर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडील मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावर एकही लोकल धावणार नाही.

रविवारी सकाळी ९.५६ ते दुपारी ४.२३ वाजेपर्यंत सीएसएमटी ते वांद्रे, अंधेरी, गोरेगाव दरम्यान दोन्ही दिशेकडे तसेच सकाळी ९.५३ ते दुपारी २.४४ वाजेपर्यंत सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी दोन्ही दिशेकडे एकही लोकल धावणार नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातील फलाट क्रमांक ८ वरून पनवेलकरिता विशेष लोकल चालविण्यात येतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते गोरेगाव दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर रविवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. दोन्ही दिशेकडील जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.


Web Title: Mega Blocks on all three lines of trains tomorrow
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.