माथेरान सुशोभीकरणाचे कार्य पन्नास टक्क्यांहून अधिक पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 07:49 PM2020-10-14T19:49:00+5:302020-10-14T19:49:21+5:30

Matheran beautification : पर्यावरणाची काळजी घेऊन हे कार्य सुरू आहे.

Matheran beautification work is more than fifty percent complete | माथेरान सुशोभीकरणाचे कार्य पन्नास टक्क्यांहून अधिक पूर्ण

माथेरान सुशोभीकरणाचे कार्य पन्नास टक्क्यांहून अधिक पूर्ण

Next

 


मुंबई : माथेरान सुशोभीकरणाचे कार्य पॅनोरमा पॉईंट, हार्ट पॉईंट, मियरा पॉईंट आणि इको पॉइंट या चार स्थानांवर सुरू आहे. दस्तूरी- माथेरान रस्ता आणि पर्यटकांसाठी असलेला वाहनतळ यांच्या सुधारणांचे कार्य वेगाने सुरू आहे. माथेरान हे परिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले असल्याचे लक्षात घेत पर्यावरणाची काळजी घेऊन हे कार्य सुरू आहे. माथेरान देखभाल समितीने दिलेल्या सूचनांचे पालन करत हे काम केले जात आहे.

आतापर्यंत चार निरीक्षण स्थानाच्या सुशोभीकरण आणि सुधारणेचे कार्य सत्तर टक्के पार पडले आहे. कामांचा प्रारंभ एप्रिल २०१८ ला झाला होता. दस्तूरी-माथेरान रस्त्याचे पस्तीस टक्के सुशोभीकरण पूर्ण झाले आहे. दस्तूरी वाहनतळाच्या सुधारणा करण्याचे नव्वद टक्के कार्य पूर्ण झाले आहे. दस्तूरी येथील या दोन्ही कामांचा प्रारंभ सप्टेंबर २०१९ मध्ये झाला होता, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली.

रस्त्यावरचे दिवे, सुचनाफलक, वाटसरूंना बसण्यासाठी बाक, घोड्यावर चढण्यासाठी केलेल्या पायऱ्या, कचराकुंड्या, दिव्यांचे खांब, सुरक्षा कठडे या गोष्टी माथेरान देखभाल समितीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, माथेरान वारसा समितीच्या नियमावलीनुसार करण्यात येतील. या सर्व सुविधांमुळे वाटसरू आणि परिसरदृश्ये पाहण्यास जाणाऱ्या पर्यटकांना चालणे सुखद होईल. तसेच त्याने पर्यावरणाची कमीतकमी हानी होईल.

----------------------

पर्यावरणीय बंधनांमुळे हे कार्य करताना काळजी घेतली जात आहे. जेव्हा हे सुशोभीकरण आणि रस्त्याच्या सुधारणांचे कार्य पूर्ण होईल, तेव्हा पर्यटक येथील नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतील.

- आर. ए. राजीव, महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

----------------------

Web Title: Matheran beautification work is more than fifty percent complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.