माथेरान ते अमन लॉज मिनी ट्रेन सेवा २८ डिसेंबरपासून होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 06:10 AM2019-12-26T06:10:34+5:302019-12-26T06:11:00+5:30

माथेरान ते अमन लॉज शटल सेवा २८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

 Matheran to Aman Lodge Mini Train service will start from 1st December | माथेरान ते अमन लॉज मिनी ट्रेन सेवा २८ डिसेंबरपासून होणार सुरू

माथेरान ते अमन लॉज मिनी ट्रेन सेवा २८ डिसेंबरपासून होणार सुरू

Next

मुंबई : माथेरान ते अमन लॉजदरम्यान मिनी ट्रेनची बुधवारी चाचणी घेण्यात आली. यावेळी विनाप्रवासी मिनी ट्रेन या मार्गावर चालविण्यात आली. चाचणीमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने माथेरान ते अमन लॉज शटल सेवा २८ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

नेरळ, माथेरान भागात जुलै, आॅगस्ट महिन्यात जोरदार पाऊस पडल्याने रेल्वेमार्गाचे मोठे नुकसान झाले. या मार्गातील खडी, रेती वाहून गेली. परिणामी नेरळ ते माथेरान २२ किमीच्या रेल्वेमार्गात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. मध्य रेल्वे प्रशासनाने मागील पाच महिन्यांपासून मिनी ट्रेनच्या फेऱ्या बंद केल्या होत्या.

दरम्यान, नेरळ ते माथेरान २२ किमीच्या मार्गावरील तब्बल ठिकाणांवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. माथेरान स्थानक परिसरात मिनी ट्रेनच्या देखभालीसाठी पीट लाईन उभारण्यात आली आहे. ही सुमारे १० फूट खोल आणि सुमारे २५ ते ३० फूट लांब असणार आहे. त्यामुळे मिनी ट्रेनच्या फेºया सुरू होणार आहेत.
माथेरान ते अमन लॉज शटल सेवा २८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तर जानेवारी महिन्यात माथेरानमध्ये लोकोशेड उभारण्याचे काम पूर्ण झाल्यावर नेरळ-माथेरान मिनी ट्रेनही सुरू करता येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
 

Web Title:  Matheran to Aman Lodge Mini Train service will start from 1st December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.