Join us  

विधान परिषदेसाठी लाड-माने यांच्यात सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 5:33 AM

विधान परिषदेच्या ७ डिसेंबरला होणाºया पोटनिवडणुकीत भाजपा-शिवसेनेचे प्रसाद लाड विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिलीप माने यांच्यात सामना होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी हे दोघेही रिंगणात कायम आहेत.

मुंबई : विधान परिषदेच्या ७ डिसेंबरला होणाºया पोटनिवडणुकीत भाजपा-शिवसेनेचे प्रसाद लाड विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिलीप माने यांच्यात सामना होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी हे दोघेही रिंगणात कायम आहेत.विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या या जागेसाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक होत आहे. भाजपाचे १२२ आणि शिवसेनेचे ६३ असे युतीचे १८५ आमदार आहेत. काँग्रेसचे ४२ आणि राष्ट्रवादीचे ४१ असे आघाडीचे ८३ आमदार आहेत. इतर २० आमदारांमध्ये लहान पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे. या २० जणांना आपल्या बाजूने करण्याचा भाजपा आणि काँग्रेसचाही प्रयत्न असेल.सत्तारूढ पक्षाकडे बहुमत आहे आणि त्या आधारे लाड यांचा विजय स्पष्ट दिसतो. या निवडणुकीत अदृश्य बाण चमत्कार करेल, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले होते. तथापि, ‘आमची युती अभेद्य आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वत:ची मते वाचविली तरी पुष्कळ आहे,’ असे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :राजकारणनारायण राणे