Join us  

श्री स्वामी समर्थ उद्यानावर गदा; सुंदर उद्यान पक्षीय राजकारणामुळे तोडण्यात येत असल्याची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 2:56 AM

मुलुंड पूर्वेकडील नीलमनगर येथील श्री स्वामी समर्थ उद्यान तोडण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. ८ वर्षांपूर्वीचे अतिशय सुंदर उद्यान पक्षीय राजकारणामुळे तोडण्यात येत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

- सागर नेवरेकरमुंबई : मुलुंड पूर्वेकडील नीलमनगर येथील श्री स्वामी समर्थ उद्यान तोडण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. ८ वर्षांपूर्वीचे अतिशय सुंदर उद्यान पक्षीय राजकारणामुळे तोडण्यात येत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.हायवेवरून मुलुंड पूर्वेला येण्यासाठी असलेल्या एकमेव नवघर रोड येथे सायंकाळी वाहनांची कोंडी होत असते. कोंडीवर मात करण्यासाठी हायवेवरून मुलुंड पश्चिमेला जाणारा मुलुंड गोरेगांव लिंक रोड आणि हायवेवरून मुलुंड स्टेशनला जाणारा नवघर रोड येथील ९० फूट रोडला जोडणारा रस्ता काढून, उद्यानांच्या आतून रस्ता काढण्यात येणार आहे. म्हणून उद्यान नष्ट होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी इतर असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे उद्यान तोडण्याची व पर्यावरण बचाव या शासनाच्या धोरणाची खिल्ली उडविण्याची आवश्यकता नव्हती. मुलुंड परिसरात मोठ्या प्रमाणात आर्किटेक्ट आणि इंजिनीअर राहतात. ते मंत्रालयातून व महापालिकेच्या विविध विभागांतून ३० ते ३५ वर्षे सेवा करून निवृत्त झाले आहेत. रस्त्याच्या संदर्भात पर्यायी मार्गाची मदत मागितली असती, तर असंख्य पर्यायी प्रस्ताव सादर करण्यात आले असते, असे नागरिकांनी सांगितले.पर्यावरणाचा ºहासउद्यान तोडल्याने पर्यावरणाचा ºहास होईल. पुन्हा नव्याने झाडे लावायची म्हटले, तर ती मोठी होईपर्यंत अनेक वर्षांचा कालावधी लोटणार. पर्यावरणाचा ºहास आणि तापमानात वाढीत नक्कीच भर पडेल.निवेदनाकडे दुर्लक्षमुलुंडवासीयांसाठी उद्यान वाचविण्यासाठी संबंधित प्रशासनाला निवेदन पाठविले आहे. शासनाच्या धोरणातील विरोधाभास, चुकीची कामकाज पद्धत, पर्यावरणाचा ºहास होत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, तसेच उद्यानात ७ ते ८ वर्षांपूर्वीपासून वाढलेल्या झाडांची रस्त्याच्या नावावर कत्तल केली जाणार आहेत.प्रशासनाकडून भ्रमनिरासउद्यानाच्या बचावासाठी निवेदन दिले आहे. त्यावर प्रशासन कारवाई करेल, असे वाटले होते, परंतु हाती अजूनही निराशाच आलेली आहे. उद्यान तोडायला येईपर्यंत कोणीही लक्ष दिलेले नाही. मुलुंडवासीयांच्या महापालिका आणि शिवसेनेकडून आशा होत्या, परंतु आता भ्रमनिरास झाला आहे. उद्यानाकडे कोणी फिरकलेसुद्धा नाही. आम्ही उद्यानाच्या बचावासाठी २५० नागरिकांनी स्वाक्षरी केलेला अर्ज प्रशासनाला पाठविला आहे. नागरिकांमध्ये सध्या प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.- रवींद्र शिंदे, स्थानिकपर्यायी मार्गाचा अवलंब कराउद्यान उद्ध्वस्त होत असताना कोणीही लक्ष देत नाही. रस्त्यासाठी पर्यायी मार्गदेखील आहेत. केळकर कॉलेजपासून ते शासनाची जागा आहे, तिथपर्यंत पर्यायी मार्ग असूनदेखील उद्यानातून रस्ता काढला जात आहे. उद्यानाच्या बाजूला नाला आहे. नाल्याच्या बाजूनेदेखील रस्ता काढता आला असता. त्या जागेवर राजकीय पक्षांच्या टपºया आहेत. या टपºयांना हात न घालता, उद्यानाला हात घातला जातोय, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.- गिरीश महाडेश्वर, स्थानिकअपघात क्षेत्रनिर्माण होईलउद्यानाच्या तोडीचे काम बंद झाले पाहिजे. आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत. आम्हाला उद्यानाची अत्यंत गरज आहे. या मार्गावर चार शाळा आहेत. पुढे भविष्यात रस्ता तयार झाला, तर अपघाताचे प्रमाण वाढेल. काही झाडांचे स्थलांतर करण्यात आले, तसेच काही झाडे आता तोडली जात आहेत. त्यामुळे उद्यानाची सुंदरता नष्ट झाली आहे.- दिलीप लोटलीकर,स्थानिक

टॅग्स :मुंबई