मराठा आरक्षण रद्द केल्याच्या विरोधात दिव्यात सामूहिक मुंडन आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 10:07 AM2021-05-10T10:07:27+5:302021-05-10T10:07:57+5:30

सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडण्यात राज्य व केंद्र सरकार असमर्थ ठरले. म्हणून न्यायालयाने आरक्षण रद्द करण्याचा आदेश दिला. असे असताना सर्वपक्षीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून आम्ही कसे बरोबर आहोत हे दाखविण्यात व्यस्त आहेत.

Mass protest in Divya against cancellation of Maratha reservation | मराठा आरक्षण रद्द केल्याच्या विरोधात दिव्यात सामूहिक मुंडन आंदाेलन

मराठा आरक्षण रद्द केल्याच्या विरोधात दिव्यात सामूहिक मुंडन आंदाेलन

Next

मुंब्रा : आरक्षण रद्द केल्याच्या विरोधात भारतीय मराठा संघाच्या दिवा शाखेने रविवारी दिव्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक मुंडन आंदोलन केले.

सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडण्यात राज्य व केंद्र सरकार असमर्थ ठरले. म्हणून न्यायालयाने आरक्षण रद्द करण्याचा आदेश दिला. असे असताना सर्वपक्षीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून आम्ही कसे बरोबर आहोत हे दाखविण्यात व्यस्त आहेत. मराठा समाजाचे खासदार, आमदार, मंत्री आणि जाणकार समाजाची बाजू मांडण्यास तयार नाहीत, याची खंत यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. आरक्षणासाठी राज्यात ५८ मोर्चे शांततेने पार पडल्याचे पाहिलेत; पण आता जेव्हा आम्ही रस्तावर उतरू तेव्हा खासदार, आमदार आणि मंत्री यांना रस्त्यांवर फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही फक्त शिक्षण व नोकरीमध्येच आरक्षण मागत आहोत. हे देता येत नसेल तर आम्ही समान नागरी कायद्याची मागणी का करू नये, असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला.

प्रदेश उपाध्यक्ष दीपक पालांडे, ठाणे महानगर संपर्कप्रमुख अरुण फणसे, मुंबई शहर संपर्कप्रमुख प्रकाश पाटील, दिवा शहराध्यक्ष निकेश खानविलकर, उपाध्यक्ष सुधीर घाणेकर, सल्लागार सखाराम मोरे, उपसचिव गणेश जाधव, खजिनदार रामकृष्ण सावंत, सोशल मीडिया प्रमुख आश्विन वारंग, संघटक संतोष फणसे आदी या मुंडन आंदोलनात सहभागी झाले होते.
 

Web Title: Mass protest in Divya against cancellation of Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.