आरे कॉलनीच्या आंदोलनाला मराठीचे वावडे ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 02:57 AM2019-09-23T02:57:25+5:302019-09-23T02:57:44+5:30

आंदोलकर्ते मराठी भाषेचा उल्लेख कमी प्रमाणात करतात, असे मराठी भाषा चळवळीतील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Marathi collections to the colony of Aarey Colony? | आरे कॉलनीच्या आंदोलनाला मराठीचे वावडे ?

आरे कॉलनीच्या आंदोलनाला मराठीचे वावडे ?

googlenewsNext

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ साठी आरे कॉलनीत मेट्रोचे कारशेड उभारण्यात येणार आहे. कारशेड उभारण्यासाठी सुमारे २ हजार २३८ झाडांची कत्तल केली जाणार आहे. या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींनी आवाज उठविला असून दर रविवारी मोठ्या संख्येने मुंबईकर उपस्थित राहून आंदोलन करतात. महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी असून त्याचा वापर आरेच्या आंदोलनामध्ये केला जात नाही. आंदोलकर्ते मराठी भाषेचा उल्लेख कमी प्रमाणात करतात, असे मराठी भाषा चळवळीतील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख म्हणाले की, राज्यातील एका शहराच्या जंगलाचा विषय हाताळतो. मात्र राज्याची स्थानिक भाषा डावलत आहात. जसे तुम्ही आता ‘सेव्ह आरे’ म्हणता, त्याप्रमाणे ‘सेव्ह मराठी’ असे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. आरेचा मुद्दा जेवढा गंभीर आहे, तेवढाच मराठी भाषेचाही मुद्दा गंभीर आहे. आंदोलकर्त्यांनी मराठी भाषेकडेही लक्ष देऊन मराठी भाषेचा आरेच्या आंदोलनात आवर्जून वापर करावा. कारण मराठीचा विसर पडू नये याची काळजी घ्यायला हवी़

स्थानिक भाषेतून मुद्दा हाताळावा
मराठी अभ्यास केंद्राचे कार्यकर्ता आनंद भंडारे यांनी सांगितले की, पर्यावरणासारखे विषय हे आपल्या मातृभाषेतून मांडले गेले, तर त्यामध्ये कमीपणा येतो, असे अलीकडे नागरिकांना वाटू लागले आहे. राज्यातला कोणताही मुद्दा हाताळताना तिथल्या स्थानिक भाषेतून मांडला पाहिजे. आपण स्थानिक भाषेमधून मुद्दे किंवा प्रश्न हाताळू तेवढे लोकांपर्यंत लवकर पोहोचतात.

Web Title: Marathi collections to the colony of Aarey Colony?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.