Join us  

मंजुळा शेट्ये हत्या प्रकरण : तपासावर उच्च न्यायालय समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 4:43 AM

मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी क्राइम ब्रँचने केलेल्या तपासावर समाधान व्यक्त करत उच्च न्यायालयाने हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याची विनंती करणारी जनहित याचिका गुरुवारी निकाली काढली.

मुंबई : मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी क्राइम ब्रँचने केलेल्या तपासावर समाधान व्यक्त करत उच्च न्यायालयाने हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याची विनंती करणारी जनहित याचिका गुरुवारी निकाली काढली.मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. भूषण गवई व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठापुढे होती.क्राइम ब्रँचने संबंधित पोलीस आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले असले तरी त्याबाबत समाधानी नसल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील नितीन सातपुते यांनी सांगितले. त्यामुळे हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात यावे, अशी विनंती सातपुते यांनी गुरुवारच्या सुनावणीत न्यायालयाला केली.‘पोलिसांनी तपास कसा करायचा, हे आम्ही सांगायचे का? पोलिसांनी केलेल्या तपासावर आम्ही समाधानी आहोत,’ असे न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :न्यायालय