Join us  

मालाडच्या चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर विधी महाविद्यालयाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

By मनोहर कुंभेजकर | Published: April 17, 2024 11:59 AM

Mumbai News: चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर (सीडब्लूसी) ट्रस्ट, मालाड पश्चिम,मार्वे रोड येथील चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर विधी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या कॉलेजला राष्ट्रीय गुणवत्ता तपासणारी संस्था (राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद) 'नॅक' कडून मानाचे 'नॅक' बी ++ हे मानांकन प्रदान करून सम्मानित करण्यात आले आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई  चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर (सीडब्लूसी) ट्रस्ट, मालाड पश्चिम,मार्वे रोड येथील चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर विधी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या कॉलेजला राष्ट्रीय गुणवत्ता तपासणारी संस्था (राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद) 'नॅक' कडून मानाचे 'नॅक' बी ++ हे मानांकन प्रदान करून सम्मानित करण्यात आले आहे. या गौरवाचे सर्वस्वी श्रेय आमचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान शिक्षणमहर्षी प्रा. अजय कौल यांचे आहे असे मत सीडब्लूसी, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अनंत कळसे यांनी व्यक्त केले.

सन 2010 मध्ये या विधी महाविद्यालयाचे संस्थापक व शिक्षण महर्षी प्राचार्य अजय कौल यांनी या संस्थेची स्थापना केली. कायद्याचे समग्र शिक्षण ३ वर्षे व ५ येथे देण्यात येते. आज मुंबईत हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच संस्थांना 'नॅक' चा दर्जा मिळाला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत विविध अभ्यासक्रम सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. विविध विद्यापीठांशी सामंजस्य करार करून सीडब्लूसीला स्वतंत्र युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करू असे अनंत कळसे यांनी सांगितले.

सदर महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सरकारद्वारे मान्यता प्राप्त आहे. चिल्ड्रन वेलफेअर सेंटर विधी महाविद्यालय ही मुंबईतील उच्च शिक्षण देणारी संस्था आहे. यात बीएलएस सह विविध अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहेत. चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर विधी महाविद्यालयात कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी विविध पायाभूत सुविधांचा लाभ घेऊन त्यांच्या शैक्षणिक अनुभवात वाढ करतात असे कळसे यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईशिक्षण क्षेत्र