महिलेच्या वेशात 'मुन्ना' करत होत्या घरफोड्या! ३६ तोळे सोनं, गावाला घेतली जमीन अन् ४१ लाखांचं घबाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:58 IST2025-06-05T16:56:38+5:302025-06-05T16:58:07+5:30

बिहारवरुन मुंबईत आल्यानंतर महिलेचे कपडे परिधान करत रेकी करुन नंतर घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मालाड पोलिसांनी अटक केली

Malad Police arrest man accused of multiple robberies | महिलेच्या वेशात 'मुन्ना' करत होत्या घरफोड्या! ३६ तोळे सोनं, गावाला घेतली जमीन अन् ४१ लाखांचं घबाड

महिलेच्या वेशात 'मुन्ना' करत होत्या घरफोड्या! ३६ तोळे सोनं, गावाला घेतली जमीन अन् ४१ लाखांचं घबाड

मुंबई

बिहारवरुन मुंबईत आल्यानंतर महिलेचे कपडे परिधान करत रेकी करुन नंतर घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. त्याला प्रथमच अटक झाली असून त्याच्याकडून ४१ लाखांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. 

रंजीतकुमार सिंह उर्फ मुन्ना असे आरोपीचे नाव आहे. तो मालाडच्या राठोडी परिसरातील रहिवासी असून मूळचा बिहारचा रहिवासी आहे. मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपती मंदिर परिसरातील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर खिडकीतून प्रवेश करुन सिंहने साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पन्हाळे, निरीक्षक महेंद्र घाग, निरीक्षक संजय बेडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार सुखदेव आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. 

चोरीच्या पैशातून जमीन, घर खरेदी
आरोपी सिंह याने चोरीच्या पैशांतून गावात १० लाखांची जमीन, तर मालवणी येथे सहा लाखांचे घर खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे. 

पाहा व्हिडिओ...

३६ तोळे सोने चांदी जप्त 
पोलिसांनी सिंह याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कटवणी आणि हातोडा ही हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. त्याने आतापर्यंत ४१ लाखांची चोरी केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  पोलिसांनी त्याच्याकडून ३६ तोळे सोने, एक किलो चांदी, सोने वितळविण्यासाठी तो वापरत असलेली मोठी मशीन हस्तगत केली. 

सलग १७ दिवस वेशांतर, १५० सीसीटीव्हीद्वारे शोध
१. अनोळखी व्यक्ती पाइपद्वारे इमारतीत वर चढत चोरी करत त्यानंतर रेल्वे रुळाच्या दिशेने पळताना पोलिसांना दिसला. मात्र, तिथून पुढे तो गायब व्हायचा. मालाड, कांदिवली, बोरीवली आणि दिंडोशीतही त्याने अशाच पद्धतीने चोरी केल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता सिंह हा महिला परिधान करत असलेली मॅक्सी, हॅण्डग्लोज तसेच महिलांची वेशभूषा परिधान करुन चोऱ्या करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

२. सलग १७ दिवस पोलिसांनीही वेशांतर करुन तपास केल्यावर तो राठोडीच्या दिशेने जाताना दिसला. जवळपास १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेरे पडताळून त्याच्यावर पाळत ठेवल्यानंतर याच परिसरातून त्याचा गाशा गुंडाळण्यात आला. गेल्या तीन महिन्यांत केलेल्या चोऱ्यांची कबुली त्याने दिली आहे. 

Web Title: Malad Police arrest man accused of multiple robberies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.