Vidhan Sabha 2019 : मतदारसंघाला काय हवं ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 01:12 AM2019-09-19T01:12:33+5:302019-09-19T01:13:00+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - सक्षम आरोग्य यंत्रणा हवी. स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य.

Maharashtra Vidhan Sabha 2019 - What should a constituency do? | Vidhan Sabha 2019 : मतदारसंघाला काय हवं ?

Vidhan Sabha 2019 : मतदारसंघाला काय हवं ?

Next

आमदाराचे नाव : विष्णू सवरा
मतदारसंघ : विक्रमगड
पक्ष : भाजप
सक्षम आरोग्य यंत्रणा हवी. स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य. पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपायोजना हवी. उच्च शिक्षणाची सुविधा हवी. एमआयडीसी हवी.
>त्यांना काय वाटतं?
आदिवासी विकासमंत्री सारखे महत्त्वाचे खाते आपल्या वाट्याला आले. या माध्यमातून मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यात मोठा निधी आपण देऊ शकलो. या माध्यमातून मतदारसंघातील वर्षानुवर्षे रखडलेले रस्ते दुपदरी करून अनेक महत्त्वाचे पूल, आदिवासी आश्रमशाळेच्या इमारती, आदिवासी संस्कृती जपण्यासाठी वारली आर्ट या सांस्कृतिक केंद्राची निर्मिती, ट्रॉमा केअर सेंटर , जव्हार येथील कुटीर रूग्णालयाचा विकास केला.
- विष्णू सवरा, आमदार
>विक्रमगड मतदारसंघ
या मतदारसंघातील धरणांवर कोट्यवधींचा खर्च झाला. परंतु या पाण्याचा उपयोग स्थानिकांना झाला नाही. राजकीय नेतृत्वाच्या अपयशामुळे झाले नाही. पेसा कायद्याची अमलबजावणी केल्यामुळे आदिवासी विकास खात्याच्या अंदाजपत्रकाच्या पाच टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना हस्तांतरित झाला. आदिवासी विद्यार्थ्यांना प्रसिद्ध शाळांमध्ये प्रवेश देत शिक्षणाचा खर्च आदिवासी विभागाने उचलला. कुपोषण रोखण्यासाठी एपीजे अब्दुल कलाम पोषण आहार योजना अमलात आणली.
>top 5 वचनं
न्यायालयाचा प्रश्न सोडवू
बसआगाराची निर्मिती
उपविभागीय कार्यालयाची निर्मिती
पाणीपुरवठा योजना करणार
उपकेंद्रांची निर्मिती
ंआमदार विष्णू सवरा यांना मंत्रिपद मिळाल्याने मतदारसंघातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मंत्रिपदाच्या माध्यमातून सवरा यांनी काही प्रमाणात विकास कामावर मोठा निधी खर्च केला. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, पूल यावर खर्च केल्याने त्यांनी कंत्राटदार यांना पोसल्याचा आरोप आता विरोधक करत आहेत. मंत्रिपदाच्या माध्यमातून या मतदारसंघातील मूलभूत प्रश्न संपण्याऐवजी दिवसागणिक तीव्र होऊ लागल्याने हे सवरांचे अपयश मानले जात आहे. आजही अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने चांगल्या नेतृत्वाची गरज आहे.
>विधिमंडळातील कामगिरी
आदिवासी विकासमंत्री म्हणून सक्षमपणे काम केले. अनेकदा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कामाचे सभागृहामध्ये कौतुक केले. पालघर जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रीपद सवरा यांच्या रूपाने पहिल्यांदा मिळाले. या मंत्रिपदाच्या माध्यमातून राज्यातील आदिवासी समाजासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात यशस्वी ठरले. सलग साडेचार वर्ष मंत्रिपद लाभून त्यांच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. विधीमंडळात कायम उपस्थित राहिले आहेत.

>पाच वर्षांत काय केलं?
मतदारसंघात राज्य, केंद्राच्या माध्यमातून राबविल्या जाणाºया विविध योजनांची प्रभावी अमलबजावणी करण्यावर भर दिला. पंतप्रधान आवास योजना, यासाठी असलेल्या विविध अनुदानाच्या योजना तसेच या भागातील आरोग्याच्या समस्येचे गांभीर्य ओळखून जिल्हा पातळीवर डॉक्टर निवड प्रक्रि या राबविली. सामान्य माणसाला सुलभतेने सरकारी योजनांचा लाभ घेता यावा यासाठी प्रयत्न, कुपोषण, बालमृत्यू रोखण्यासाठी उपाय योजना राबविण्यावर भर.
>दोन तरूणांनी केली आत्महत्या
नालासोपारा : पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील परिसरातील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नालासोपारा पूर्वेकडील टाकीपाडा परिसरातील आंबेडकर नगरमधील निवास नंबर ३६ मध्ये राहणारा मिथुन गौतम तांबे (३५) या तरुणाने सोमवारी क्षुल्लकावरून ओढणीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तुळींज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे तर दुसºया घटनेत पश्चिमेकडील पांचाळ नगरमधील कृष्णा दर्शन बिल्डिंगच्या सदनिका नंबर २०१ मध्ये राहणारा धर्मेंद्र भवरलाल गायरी (२१) या तरुणाने सोमवारी सत्यम कॉम्प्लेक्समधील सदनिका नंबर १०४ मधील गोदामात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नालासोपारा पोलिसांनी नोंद केली आहे.
>बेरोजगारीमुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असून यासारखे प्रश्न आजही कायम आहेत. लोकांच्या हाताला काम नसल्याने येथील आदिवासी समाज दारिद्र्यात खितपत पडला आहे. येथील आदिवासी आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहत असल्याने त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
- ज्ञानेश्वर सांबरे, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
>हे घडलंय...
मतदारसंघातील रस्ते व पुलांची निर्मिती
आरोग्य उपकेंद्र
विकासकामांसाठी चारशे कोटी खर्च
जव्हार व साखर येथे वीज उपकेंद्र
>हे बिघडलंय...
पाणीटंचाईचे संकट कायम
रोजगार निर्मिती करण्यात अपयश
आरोग्ययंत्रणा कोलमडली
सिंचन व्यवस्था कोलमडली

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 - What should a constituency do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.