Vidhan Sabha 2019: 'महाराष्ट्राच्या घराघरात दिवाळी साजरी होणार; किमान 220 जागा मिळणार, भाजपाचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 12:44 PM2019-09-21T12:44:54+5:302019-09-21T12:46:02+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : गेल्या 5 वर्षात काय केलं आणि पुढच्या 5 वर्षात काय केलं याबाबत येणाऱ्या महिनाभर मतदारांपर्यंत पोहचवेल

Maharashtra Vidhan Sabha 2019: 'Diwali will be celebrated in Maharashtra homes; BJP claims to get at least 220 seats Says Vinod tawade | Vidhan Sabha 2019: 'महाराष्ट्राच्या घराघरात दिवाळी साजरी होणार; किमान 220 जागा मिळणार, भाजपाचा दावा 

Vidhan Sabha 2019: 'महाराष्ट्राच्या घराघरात दिवाळी साजरी होणार; किमान 220 जागा मिळणार, भाजपाचा दावा 

Next

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यामुळे पुढील महिनाभर राज्यभरात राजकीय फटाके फुटणार आहे. 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असल्याने दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात नवीन सरकार कोणाचं येईल हे स्पष्ट होणार आहे. 

निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर भाजपाचे मंत्री विनोद तावडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुन्हा भाजपा महायुतीचं सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच गेल्या 5 वर्षात काय केलं आणि पुढच्या 5 वर्षात काय केलं याबाबत येणाऱ्या महिनाभर मतदारांपर्यंत पोहचवेल. किमान 220 जागा मिळतील, विरोधक बिथरले आहे, हत्यार म्यान केले त्यामुळे आकडा वाढण्याची शक्यता आहे असा दावाही विनोद तावडेंनी केला आहे.

महाजनादेश, जनआशीर्वाद, शिवस्वराज्य या यात्रा महाराष्ट्रभर फिरू लागल्यापासून ज्या घोषणेकडे सगळ्यांचेच कान लागले होते, ती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर झाली आहे. २०१४च्या निवडणुकीप्रमाणेच यंदाची विधानसभा निवडणूकही एकाच टप्प्यात होणार असून २१ ऑक्टोबर रोजी राज्यात मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतर ३ दिवसांनी, म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. हरियाणा विधानसभेची निवडणूकही महाराष्ट्रासोबतच होणार आहे.

दरम्यान शिवसेनेसोबत निवडणुका लढणार हे स्पष्ट आहे. जागावाटपावर चर्चा सुरु आहे, बातम्यांमधील आकड्यांवर विश्वास ठेऊ नये. पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचे आकडेवारी जाहीर करु. शिवसेना आम्ही मित्रपक्ष, एकमेकांसोबत बसून निर्णय घेऊ. जेव्हा आम्ही कमकुवत होतो तेव्हाही शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करत होतो जास्तीत जास्त जागा मिळाव्यात म्हणून दोन्ही पक्ष प्रयत्न करत असतात असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिवसेनेने सामनातून पाच वर्षात मोदींवर आणि सरकारवर टीका केली त्यावर   मी सामना वाचत नाही, त्यामुळे ते काय लिहितात याची माहिती नाही असं सांगून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. 
 

महत्वाच्या बातम्या 

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर; २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ऑक्टोबरला मतमोजणी

'हीच माझी इच्छा... महाराष्ट्रानं मला भरभरुन दिलं', पवारांचं भावनिक ट्विट

'शरद पवारांचे राजकारण संपले आता माझ्या राजकारणाची सुरुवात झाली'

कसं काय...बरं हाय ना! भाजपाचा 'रम्या' देणार विरोधकांना प्रेमाचे डोस; कोण आहे तो?

युती झाल्यास मोठी बंडखोरी, काँग्रेस, वंचितसह राष्ट्रवादीही पंचंड आशावादी

Exclusive : ... म्हणून राज ठाकरे आघाडीत नाहीत, पवारांचं लोकमतला 'मनसे' उत्तर 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019: 'Diwali will be celebrated in Maharashtra homes; BJP claims to get at least 220 seats Says Vinod tawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.