Join us  

महाराष्ट्र राजभाषा विधेयक सादर

By admin | Published: July 25, 2015 1:15 AM

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम (१९६४)मधील कलम १मध्ये मराठी भाषेचा ‘राजभाषा’ असा सुस्पष्ट उल्लेख नसल्यामुळे या अधिनियमात सुधारणा करणारे महाराष्ट्र राजभाषा

मुंबई : महाराष्ट्र राजभाषा अधिनियम (१९६४)मधील कलम १मध्ये मराठी भाषेचा ‘राजभाषा’ असा सुस्पष्ट उल्लेख नसल्यामुळे या अधिनियमात सुधारणा करणारे महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अधिनियम २०१५ हे विधेयक आज विधानसभेत मांडले. विरोधकांच्या गोंधळातच मराठी भाषा मंत्री तावडे यांनी हे सुधारणा विधेयक मांडले. महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या या विधेयकाच्या प्रसंगी विरोधकांनी गोंधळ घालू नये. गेली अनेक वर्षे मराठी भाषेसाठी काहीही न करणाऱ्या विरोधकांनी शांतता बाळगावी, असे आवाहन तावडे यांनी केले. मराठीचे गोडवे घालणाऱ्या विरोधकांनी मराठी भाषेच्या भल्यासाठी यात अडथळे आणू नयेत, गेली १५ वर्षे सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारने जे केले नाही, ते विधेयक भाजपा-शिवसेनेने आणले, असेही तावडे यांनी सांगितले. सध्याच्या अधिनियमात संक्षिप्त नाव, विस्तार आणि प्रारंभ यांत मराठी राजभाषा असल्याचा कुठेही स्पष्ट उल्लेख नाही. परंतु महाराष्ट्र अधिनियमात ‘मराठीविषयी जिचा अंगीकार केला आहे, अशी देवनागरी लिपीतील ‘मराठी भाषा’ असा समजावा असा,’ हा संदिग्ध उल्लेख होता. आता या दुरुस्तीमुळे संदिग्धता दूर होईल. (विश्ोष प्रतिनिधी)