महाराष्ट्र टपाल सर्कलचा देशात चौथा क्रमांक, स्पीड पोस्टचे एक कोटी ग्राहक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 05:06 AM2019-10-12T05:06:49+5:302019-10-12T05:07:01+5:30

आयपीपीबीद्वारे आधार इनेबल पेमेंट सिस्टमच्या माध्यमातून देशातील कोणत्याही बँकेतील खातेदाराला आधार क्रमांक जोडलेला असल्यास पैसे काढण्याची सुविधा देण्यात आली आहे.

Maharashtra Post Circle has the fourth highest number of subscribers in the country | महाराष्ट्र टपाल सर्कलचा देशात चौथा क्रमांक, स्पीड पोस्टचे एक कोटी ग्राहक

महाराष्ट्र टपाल सर्कलचा देशात चौथा क्रमांक, स्पीड पोस्टचे एक कोटी ग्राहक

Next

मुंबई : इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) मध्ये दहा लाख खातेदारांसह टपाल खात्याच्या महाराष्ट्र व गोवा सर्कलने देशात चौथा क्रमांक पटकावला आहे. हे प्रमाण देशाच्या एकूण एक कोटी खातेदारांच्या दहा टक्के आहे, अशी माहिती महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल एच. सी. अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली
आयपीपीबीद्वारे आधार इनेबल पेमेंट सिस्टमच्या माध्यमातून देशातील कोणत्याही बँकेतील खातेदाराला आधार क्रमांक जोडलेला असल्यास पैसे काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. चौदा हजार ग्रामीण डाक सेवक, सहा हजार पोस्टमन यांच्या माध्यमातून १२,०४९ पोस्ट कार्यालयात व ४२ टपाल खात्याच्या १,२९३ आधार केंद्रांद्वारे ६८,१०० जणांनी नवीन आधार कार्ड काढले तर ५,९०,४६० जणांनी आधार अद्ययावतीकरण करून घेतले. आधारसाठी राज्यभरात २७० कॅम्प आयोजित केले होते.
स्पीड पोस्टच्या माध्यमातून दर महिन्याला एक कोटी पेक्षा जास्त पार्सल चे बुकिंग करण्यात येते व राज्यात दरमह ६७,५०,००० पार्सलचे वितरण होत असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली.
यावेळी मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे, नवी मुंबईच्या पोस्ट मास्टर जनरल
शोभा मधाळे, संचालक कैया अरोरा, डॉ अजिंक्य काळे, जनसंपर्क अधिकारी संतोष कुलकर्णी उपस्थित होते.

इ कॉमर्स पार्सल प्रोसेडिंग केंद्राद्वारे १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत चार लाख पार्सलद्वारे ७,८२,००० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. पोस्टमन मोबाइल अ‍ॅपसाठी ७,९६७ मोबाइल पुरवण्यात आले असून दररोज सुमारे १,८०,००० पार्सल याद्वारे हाताळले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. भिवंडी व अलिबाग येथे पासपोर्ट सेवा केंद्र लवकरच सुरू होईल असे शोभा मधारे म्हणाल्या तर जीपीओ हेरिटेज वॉकला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती स्वाती पांडे यांनी दिली.

Web Title: Maharashtra Post Circle has the fourth highest number of subscribers in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.