Maharashtra Government: ग्रँट हयातमध्ये महाविकास आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 05:31 AM2019-11-26T05:31:31+5:302019-11-26T05:32:12+5:30

राज्यातील सत्तासंघर्ष असता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असताना शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आणि सहयोगी पक्षाच्या महाविकास आघाडीने सोमवारी मुंबईत १६२ आमदारांचे जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena-NCP-Congress MLAs have assembled at Hotel Grand Hyatt | Maharashtra Government: ग्रँट हयातमध्ये महाविकास आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन

Maharashtra Government: ग्रँट हयातमध्ये महाविकास आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन

Next

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष असता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असताना शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आणि सहयोगी पक्षाच्या महाविकास आघाडीने सोमवारी मुंबईत १६२ आमदारांचे जोरदार शक्तीप्रदर्शन केले. बहुमत नसतानाही मणिपूर, गोवा या राज्यात भाजपने सत्ता स्थापन केली. पण हा गोवा नाही, महाराष्ट्र आहे. आमच्यावर काही चुकीचे लादले तर त्याला उत्तर देण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे, असा सज्जड दम खा. शरद पवार यांनी भाजपला दिला. तर कुणी आडवा आला तर त्याचे काय करायचे हे शिवसेना पाहून घेईल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या १६२ आमदारांची तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांसमोर ओळखपरेड करण्यात आली. तसेच संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला संविधानाच्या रक्षणासह मतदारसंघ आणि पक्षाशी एकनिष्ठ राहाण्याची शपथ देण्यात आली. आ. जितेंद्र आव्हाड यांनी ही शपथ सर्व आमदारांनी दिली.

यावेळी बोलताना खा. शरद पवार यांनी भाजपसह अजित पवारांना इशारा दिला. ते म्हणाले, जाणीवपूर्वक काही गैरसमज पसरविले जात आहेत. अजित पवार यांच्यावर पक्षाने कारवाई केलेली आहे. व्हीपचा धाक दाखवून आमदारकी धोक्यात येईल अशी कोणी भीती घातली जात आहे. पण पदावरून दूर केलेल्या व्यक्तीला आता कोणताही अधिकार उरलेला नाही. त्यामुळे तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही. मी संसद, घटनातज्ज्ञ आणि अनेक निवृत्त वरिष्ठांकडून स्पष्टता घेतली आहे. त्यामुळे तुम्ही कसलीही काळजी करु नका. सगळी जबाबदारी मी व्यक्तीगतरित्या घ्यायला तयार आहे, अशा शब्दात पवार यांनी आमदारांना धीर दिला.

भाजपने कर्नाटक, गोवा, मणिपूर अशा अनेक राज्यात बहूमत नसताना सत्ता स्थापनेचे प्रयत्न केले. संसदीय प्रथा परंपरांना, मार्गदर्शक तत्वांना हरताळ फासून सत्ता चालवण्याचे काम भाजपने देशभरात केले आहे. आता महाराष्टÑाची वेळ आली आहे. २८८ आमदारांपैकी १६२ आमदार ज्या आघाडीकडे आहेत त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत.
यावेळी काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भाषणे झाली. यावेळी मल्लिकार्जुन खरगे, प्रफुल्ल पटेल, राजू शेट्टी, आदित्य ठाकरे, संजय राऊत, छगन भुजबळ, जयंत पाटील, अबू आझमी, एकनाथ शिंदे, रामदास कदम, दिवाकर रावते, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, नवाब मलिक हे नेते यावेळी उपस्थित होते.
आता शिवसेना सोबत आहे : हे गोवा नाही. महाराष्टÑ आहे. येथे काहीही खपवून घेतले जाणार नाही. तसे करणाऱ्यांना धडा शिकवण्याची ताकद आमच्याकडे आहे. आता शिवसेना आपल्यासोबत आहे, तेव्हा धडा शिकवण्याच्या पध्दतीबद्दल मी फार काही सांगण्याची गरज नाही, असे शरद पवार म्हणताच उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांचा गजर केला.

आम्ही आलोय, रस्ता मोकळा करा - ठाकरे
मी पुन्हा येणार असे मी म्हणणार नाही, पण आम्ही आलोय, आता रस्ता मोकळा करा, आणि हिंमत असेलच तर आमच्या वाटेत येऊन पहाच, मग कळेल आम्ही काय आहोत ते, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला.
ते म्हणाले, आपली लढाई सत्तेसाठी नसून सत्यमेव जयतेसाठी आहे. आज हा उत्साह पाहूनही सत्तेला चिटकून बसलेल्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नसेल तर त्यांचे दुर्देव. पण आता आम्हाला जेवढे अडवण्याचे काम कराल तेवढे आम्ही घट्ट होऊ हे लक्षात ठेवा. आम्ही केवळ दोन पाच वर्षासाठी एकत्र आलो नाहीत. तर पाचचा पाढा पूर्ण करण्यासाठी आलोय. ही ताकद आणि शक्ती अशीच जपून ठेवू असे आवाहनही त्यांनी केले.



शिवसैनिकांच्या जागत्या पहाºयात आमदारांचा शपथविधी
मुंबई : राज्यातील सत्ता नाट्याचा नवा अंक सोमवारी ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडला. महाविकास आघाडीच्या १६२ आमदारांची ओळख परेडच इथे घेण्यात आली. आमदारकीची शपथ घेण्याआधी या निर्वाचित लोकप्रतिनिधींना महाविकास आघाडीसोबत राहण्याची, भाजपला मदत न करण्याची शपथ घ्यावी लागली. हयात हॉटेलमध्ये निष्ठेची शपथ वाहिल्यानंतर सर्व आमदारांची पुन्हा त्यांचा मुक्काम असलेल्या हॉटेलांमध्ये रवानगी करण्यात आली.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांचा सध्या मुंबईतील विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम आहे. आमदार भाजपच्या गळाला लागू नयेत, फाटाफुट होऊ नये यासाठी महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेनेचा आमदारांचा हॉटेलात ललितमधील मुक्काम हॉटेल लेमन ट्रीमध्ये हलविला आहे. तर, काँग्रेसचे सर्व आमदार हॉटेल जे. डब्लू मेरियट येथे मुक्कामी आहेत. राष्ट्रवादीतील आमदार ग्रँड हयात आणि सोफिटेल या दोन हॉटेलमध्ये आहेत. विशेषत: अजित पवार यांच्यासोबत गेलेले १४ आणि अन्य दहा आमदार हॉटेल सोफिटेलमध्ये आहेत. आमदारांमध्ये चलबिचल होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
आमदार थांबले आहेत तिथे संबंधित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा जागता पहारा आहे. शिवसैनिकांवरही जबाबदारी सोपविली आहे. दिवसातून तीनवेळा आमदारांच्या सह्या घेतल्या जात असून दर दोन तासाला आमदारांच्या ठिकाण्याची तपासणी करावी लागत असल्याची माहिती याची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ पदाधिकाºयाने दिली. तर, हॉटेलमध्ये कोणाकोणाची ये-जा सुरू आहे, याची इत्यंभूत माहिती शिवसैनिकांकडे जमा होत आहे. याकामी शिवसेनेच्या कामगार सेनेची मोठी मदत होत आहे. मुंबईत बहुतांश पंचतारांकित हॉटेलांत भारतीय कामगार सेनेची युनियन आहे. त्यामुळे हॉटेलमधल्या प्रत्येक गोष्टीची शिवसेनेला खबर मिळते. जिथे युनियन नाही तिथेही सेनेचे नेटवर्क असल्याचा फायदा मिळत आहे. सध्या आमदार थांबलेल्या हयात, सोफिटेल, जे.डब्लू. मेरियट या हॉटेलात शिवसेनेची युनियन आहे. शिवसेना आमदार थांबलेल्या ललितमध्ये युनियन नसली तरी माणसे आपली आहेत, अशी प्रतिक्रिया पदाधिकाºयाने दिली.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena-NCP-Congress MLAs have assembled at Hotel Grand Hyatt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.