Maharashtra Government: ‘मित्रपक्षाच्या हट्टामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 04:56 AM2019-11-13T04:56:40+5:302019-11-13T04:57:24+5:30

मित्रपक्षाच्या हट्टामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचा आरोप भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेनेवर केला आहे.

Maharashtra Election, Maharashtra Government: 'President's rule in the state due to the stubbornness of the Allies' | Maharashtra Government: ‘मित्रपक्षाच्या हट्टामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट’

Maharashtra Government: ‘मित्रपक्षाच्या हट्टामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट’

Next

मुंबई : मित्रपक्षाच्या हट्टामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचा आरोप भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेनेवर केला आहे.
काही राजकीय पक्षांनी जनादेशाचा अनादार केला. अवकाळी पावसानंतर राज्यात शेतकरी संकटात आहे. अनेक समस्या आहे. जनादेशाच्या अनादरामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली. काँग्रेस- राष्ट्रवादीने अद्याप शिवसेनेला पाठिंबा दिलेला नाही किंवा त्यांच्या लोकांनी अद्याप शिवसेना नेत्यांची भेटही घेतलेली नाही. त्यामुळे आम्ही ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहोत. भाजपच्या कोअर कमिटीची सोमवारी बैठक झाली. भाजप सर्व राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे त्यांनी सांगितले. जनादेश असल्यामुळे लवकर सरकार स्थापन व्हावे, ही इच्छा होती. आम्ही कुठल्याही पयार्याचा शोध घेतला नाही. पण आमच्या मित्रपक्षाने इतर पर्याय असल्याचे म्हटले, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: 'President's rule in the state due to the stubbornness of the Allies'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.