Maharashtra Election 2019: MNS Slams Amruta Fadnavis | Maharashtra Election 2019: मामूची मामी करमणुकीची नाही कमी; अमृता फडणवीसांना मनसेचे प्रत्युत्तर
Maharashtra Election 2019: मामूची मामी करमणुकीची नाही कमी; अमृता फडणवीसांना मनसेचे प्रत्युत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले आहे. त्यातच अमृता फडणवीस यांनी एका मराठी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत मनसेप्रमुखराज ठाकरे म्हणजे फक्त  एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट असं विधान केलं होतं. या विधानानंतर मनसेने देखील अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 

मनसे समर्थकांनी अंग्रिया क्रुझच्या उद्घाटनप्रसंगी बोटीच्या टोकावर बसून सेल्फी काढतानाचा अमृता फडणवीस यांचा व्हिडिओ शेअर करत 'मामूची मामी करमणुकीची नाही कमी' म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट असं म्हणत टोला लगावला आहे.

अमृता फडणवीस यांनी एका मराठी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीमधील रॅपिड फायर राऊंडमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये, राज ठाकरेंबद्दल एका वाक्यात काय सांगाल असे विचारण्यात आले. त्यावर राज ठाकरे म्हणजे एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट असं म्हणटले होते. तसेच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना 'बडे भैय्या' आणि शरद पवारांबद्दल बोलताना, मला त्यांचा खूप आदर आहे. या वयातही ते ज्या पद्धतीने पळतात ते पाहून अभी तो मै जवान हूँ असं अमृता यांनी म्हटले होते. त्याचप्रमाणे, पती देवेंद्र यांच्याबद्दल सांगताना, घरातून गायब असलेले मिस्टर इंडिया, असे विनोदी उत्तर त्यांनी दिले होते.

Web Title: Maharashtra Election 2019: MNS Slams Amruta Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.