Maharashtra Election 2019 : मतदानासाठी जाताय? मग 'या' आवश्यक गोष्टी विसरू नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 11:25 AM2019-10-20T11:25:17+5:302019-10-20T11:34:23+5:30

एक जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे.

Maharashtra Election 2019: Going to Vote? A list of alternative documents for voter Identity Card | Maharashtra Election 2019 : मतदानासाठी जाताय? मग 'या' आवश्यक गोष्टी विसरू नका!

Maharashtra Election 2019 : मतदानासाठी जाताय? मग 'या' आवश्यक गोष्टी विसरू नका!

googlenewsNext

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे.

मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना ओळखपत्र सादर करणे बंधनकारक आहे. यासाठी मतदारांकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले मतदान ओळखपत्र नसेल तर काही हरकत नाही. मात्र, यासाठी पासपोर्ट, पॅनकार्ड अशी खालील दिलेली आवश्यक ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे या ग्राह्य ओळखपत्रांच्या आधारे मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 

याशिवाय, मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही?, हे पाहणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही. मतदार यादी तुम्ही घरबसल्याही तपासू शकता. यासाठी निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या वेबसाईटवर मतदान केंद्राबद्दल एका क्लिकवर माहिती मिळू शकेल.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी  21 तारखेला संपूर्ण राज्यात इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे मतदान होणार आहे. 288 जागांसाठी होणाऱ्या या मतदानासाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट  सज्ज करण्यात आली आहेत. शिवाय, 1 लाख 35 हजार 21 VVPAT (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली आहेत.

मतदानासाठी आवश्यक पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणारे ओळखपत्र
1.  मतदान कार्ड
2. पासपोर्ट (पारपत्र)
3. वाहन चालक परवाना - Driving Licence
4. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे आयकार्ड)
5. छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक
6. पॅनकार्ड (PAN card)
7. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड
8. कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
9. मनरेगा जॉबकार्ड
10. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
11. खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
12. आधारकार्ड (Aadhar)

Web Title: Maharashtra Election 2019: Going to Vote? A list of alternative documents for voter Identity Card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.