Join us  

Maharashtra Election 2019 :काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर वंचित तसेच एमआयएमचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 6:00 AM

एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत वंचितला चेंबूर विधानसभेतून मोठ्या प्रमाणावर मतदान झाले होते. या भागात मिश्र मतदार असले तरी बौद्ध मतदारांचे प्रमाण जास्त आहे. त्यांचा कौल निर्णायक ठरू शकतो. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि रिपाइंचे दीपक निकाळजे यांच्यात झालेल्या मतविभागणीचा फायदा शिवसेनेचे प्रकाश फातर्फेकर यांना झाला होता. आता काँग्रेसचा सामना शिवसेनेशी असणार आहे. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.मुस्लीम आणि बौद्ध मतदार आपल्याकडे पुन्हा वळविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला कसरत करावी लागणार आहे. चेंबूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार प्रकाश फातर्फेकर, काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे, मनसेचे कर्ण (बाळा) दूनबळे, वंचितचे राजेंद्र माहुलकर आणि इतर आठ उमेदवारांचा समावेश आहे.कुर्ला विधानसभेत २०१४ च्या निवडणुकीत मंगेश कुडाळकर विजयी झाले होते. त्या वेळी भाजपचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर, एमआयएम तिसºया क्रमांकावर तर मिलिंद कांबळे चौथ्या क्रमांकावर होते. तेव्हा सर्व पक्ष स्वबळावर लढले होते़ आता काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आणि भाजप-शिवसेनेची युती आहे. या मतदारसंघातील वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे आघाडीला दिलासा मिळाला आहे. या भागात मुस्लीम मतदारांचे प्रमाण बºयापैकी असल्यामुळे एमआयएमला त्याचा फायदा होईल की आघाडीला हे लवकरच स्पष्ट होईल. या मतदारसंघातून सात उमेदवारांमध्ये लढत आहे. यामध्ये शिवसेनेचे उमेदवार मंगेश कुडाळकर, राष्ट्रवादीचे मिलिंद कांबळे, मनसेचे आप्पा आवचरे, बसपाचे नितीन भोसले यांसह इतर तीन उमेदवारांचा समावेश आहे.कलिना विधानसभेतून २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे संजय पोतनीस जिंकले होते. तर भाजप दुसºया, काँग्रेस तिसºया आणि राष्ट्रवादी काँग्रेस चौथ्या क्रमांकावर होती. आता १४ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय पोतनीस, काँग्रेसचे उमेदवार जॉर्ज अब्राहम, मनसेचे उमेदवार संजय तुर्डे, वंचितच्या मनीषा जाधव आणि एमआयएम मोहम्मद सुफियान सय्यद यांचा समावेश आहे. तर आघाडीच्या मतपेटीला वंचित आणि एमआयएम खिंडार पाडणार आहे. मतविभागणी रोखण्यासाठी आघाडीला प्रयत्न करावे लागणार आहेत.

टॅग्स :कालिनाचेंबूरकुर्ला