महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजप-सेना नेत्यांतील अबोला कायम, कोंडी फोडण्यात अद्याप अपयशच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 06:48 AM2019-11-14T06:48:53+5:302019-11-14T06:49:13+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजप-शिवसेनेतील अबोला कायम असून, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी केलेल्या विधानानंतर दरी कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता अधिक आहे.

Maharashtra Election 2019: BJP-Sena leaders no talk, still failing to break the barrier | महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजप-सेना नेत्यांतील अबोला कायम, कोंडी फोडण्यात अद्याप अपयशच

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजप-सेना नेत्यांतील अबोला कायम, कोंडी फोडण्यात अद्याप अपयशच

Next

मुंबई : भाजप-शिवसेनेतील अबोला कायम असून, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी केलेल्या विधानानंतर दरी कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता अधिक आहे.
सूत्रांनी सांगितले की, भाजपचे काही नेते, उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेचे नेतेदेखील भाजप नेत्यांशी फोनवर बोलतात आणि एकत्र येण्याची भावनाही व्यक्त करतात, पण फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा कमी करण्यात यश आलेले नाही.
भाजपने प्रयत्न केले, तरीही त्यांना प्रतिसाद द्यायचा नाही, अशी भूमिका उद्धव यांनी घेतली आहे. त्याच वेळी ते काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा करीत आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीची कोंडी फुटण्याची शक्यता सध्यातरी धुसर आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: BJP-Sena leaders no talk, still failing to break the barrier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.