Maharashtra Budget 2021: राज्याच्या बजेटमध्ये अजित पवारांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 02:33 PM2021-03-08T14:33:21+5:302021-03-08T14:42:39+5:30

Maharashtra Budget 2021: Important announcements made by Finance Minister Ajit Pawar in the Maharashtra Budget : महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आज, सोमवारी वित्तमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) विधानसभेत सादर करत आहे.

Maharashtra Budget 2021: Important announcements made by Finance Minister Ajit Pawar in the Maharashtra Budget at a click | Maharashtra Budget 2021: राज्याच्या बजेटमध्ये अजित पवारांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवर

Maharashtra Budget 2021: राज्याच्या बजेटमध्ये अजित पवारांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवर

Next

मुंबई: महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आज, सोमवारी वित्तमंत्री अजित पवार  (Finance Minister Ajit Pawar)  विधानसभेत सादर करत आहे. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला ठाकरे सरकार काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत, यात 3 लाखापर्यंत पीककर्ज घेणाऱ्या नियमित वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बळकटीकरणासाठी 4 वर्षासाठी 2 हजार कोटींची घोषणा केली आहे. तसेच राज्यात आरोग्य सेवांसाठी 7,500 कोटींची तरतूद आणि नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी विधानसभेत दिली. 

आतापर्यंत अजित पवारांनी नेमक्या काय घोषणा केल्या जाणून घ्या-

  • आरोग्य सेवांसाठी 7500 कोटींची तरतूद
  • सरकारी रुग्णालयांत आग रोधक उपकरणे लावण्यात येतील.
  • सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारणार
  • कोरोना काळात औद्योगिक काळात घट झाली, परंतू बळीराजाने तारले. शेतमालाचा व्यवहार पारदर्शी करण्यासाठी शासन प्रयत्नात
  • शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आणि ज्यांनी हे कर्ज वेळेत भरले त्यांना शून्य़ टक्के व्याजदराने कर्ज मिळणार. व्याज राज्य सरकार भरणार
  • कर्जमुक्तीनंतर 42 हजार कोटी रुपयांचं पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आलं
  • कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी 1500 कोटींचा महावितरणला निधी
  • विकेल ते पिकेल योजनेला 2100 कोटी 
  • कृषी संशोधनासाठी विद्यापीठांना दरवर्षी 200 कोटी रुपयांची तरतूद 
  • जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना 12 हजार 919 कोटींचा निधी 
  • जलसंधारण विभागासाठी 2 हजार 60 कोटींचा निधी प्रस्तावित 
  • गोसीखुर्द प्रकल्पासाठी 1 हजार कोटींची तरतूद, महत्वाच्या 12 धरणांच्या बळकटीसाठी 624 कोटी
  • ग्रामविकास विभागासाठी 7 हजार 350 कोटींचा निधी प्रस्तावित
  • ईस्टर्न फ्री वे ला विलासराव देशमुख यांचे नाव
  • पुण्याच्या 8 पदरी रिंगरोडसाठी 24 हजार कोटी लागणार, यावर्षीपासून भूसंपादनाचे काम हाती घेतले जाईल
  • मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय असलेले रेवस-रेडी मार्गासाठी 9573 कोटींचा खर्च अपेक्षित
  • निसर्ग चक्रीवादळ आणि राज्यातील आपत्ती पाहून महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची तुकडी कायमस्वरुपी ठेवण्यासाठी केंद्राकडे मागणी
  • एसटी महामंडळासाठी 1400 कोटी रुपयांची घोषणा
  • पुणे, नगर, नाशिक 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार, 16139 कोटी मंजूर
  • नागपूर मेट्रो न्यू प्रकल्प हाती घेणार
  • ठाण्यात 7500 कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेणार
  • अहमदनगर,बीड, परळी, वर्ध्यात रेल्वेमार्गाचे काम वेगाने करणार
  • महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाची तुकडी ठेवणार
  • आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी 11315 कोटी
  • समृद्धी महामार्गाचे काम 44% पूर्ण झाले, 500 किमीचा रस्ता 1 मे ला खुला करणार
  • नांदेड ते जालना 200 किमीचा नवा मार्ग उभारणार
  • गोव्याला जाण्यासाठी 540 किमीच्या समुद्री मार्गासाठी 9540 कोटी
  • स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद 
  • राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, घर खरेदी करताना महिलेच्या नावाने घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देणार 
  • घरकुल योजनेसाठी 6800 कोटींची तरतूद करण्यात आली. यातून गरिबांना हक्काचे घर मिळण्यास मदत होईल
  • जीर्ण अवस्थेत असलेल्या शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी 3000 कोटींची तरतूद 
  • ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना बसने मोफत प्रवास राज्यव्यापी योजना
  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नावाने योजना, 1500 हायब्रीड बस देणार, मोठ्या शहरात तेजस्विनी योजनेत अधिक बस उपलब्ध करून देणार  
  • शेती आणि शेतकरी यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील
  • इमारतीसाठी 73 कोटी. ससून रुग्णालयातील कर्मचारी निवासासाठी 28 कोटी रुपये मंजूर
  • राज्यातील 11 परिचारिक प्रशिक्षण वर्गांचे महाविद्यालयात रुपांतर करणार
  • लातूरच्या रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण इमारतीसाठी 73 कोटी
  • ससून रुग्णालयातील कर्मचारी निवासासाठी 28 कोटी रुपये मंजूर
  • मुंबईसाठी महत्वाच्या असलेल्या कोस्टल रोडचं काम 2024 पूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार
  • धूतपापेश्वर मंदीर, एकवीरा मंदीर, खंडोबा मंदीर, आनंदेश्वर, शिव मंदीरांचा विकास करणार
  • सिंधुदूर्ग, रत्नागिरीमध्ये पर्यटन, मस्त्य व्यवसाय, सूक्ष्म उद्योगांचा विकास करण्यासाठी सिंधुरत्न योजना. तीन वर्षांत 300 कोटी निधी देणार
  • घरकाम करणाऱ्या महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी संत जनाबाई यांच्या नावाने योजना, त्यासाठी 250 कोटी रुपये बीजभांडवलाची तरतूद
  • महाज्योती, सारथी, बार्टी या संस्थांसाठी प्रत्येकी दिडशे कोटी उपलब्ध करून देण्यात येतील, MPSC च्या बळकटीकरणासाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद
  • 10 हजार 226 कोटी महसुली तूट, राजकोशीय तूट 66 हजार कोटी
  • मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे 700 किमी पैकी 500 किमीचे काम पूर्ण
  • नागपूर ते शिर्डी मार्ग 1 मे 2021 रोजी मार्ग खुला करण्यात येणार
  • मद्यावरील कर वाढवला
  •  अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलबाबत काहीही घोषणा नाही

Web Title: Maharashtra Budget 2021: Important announcements made by Finance Minister Ajit Pawar in the Maharashtra Budget at a click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.