Maharashtra Budget 2019: House Plan for handicapped; 100 crore provision! by sudhir mungatiwar | महाराष्ट्र बजेट 2019: दिव्यांगांसाठी घरकुल योजना; 100 कोटींची तरतूद!
महाराष्ट्र बजेट 2019: दिव्यांगांसाठी घरकुल योजना; 100 कोटींची तरतूद!

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर होत असलेल्या राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणेच घोषणांचा पाऊस पडत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विविध वर्गांसाठी वेगवेगळ्या योजना आणि भरीव निधी  जाहीर करत असून 'सबका साथ' मिळवण्यासाठी 'सब का विकास'ची ग्वाही दिली जात आहे. त्या अंतर्गत, दिव्यांगांसाठी घरकुल योजनेची घोषणा सरकारने केली आहे.  

८० टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींना सरकार घर बांधून देणार असून या योजनेसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं. दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेल्या या अर्थसंकल्पातील अन्य काही तरतुदी खालीलप्रमाणे...  


>> महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीवर्षानिमित्त कार्यक्रम आयोजनासाठी १५० कोटी

>> सरपंच मानधन वाढीसाठी २०० कोटी

>> तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी बस स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी १०० कोटी

>> अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षासाठी १०० कोटी

>> सार्वजनिक आरोग्यासाठी १०,५७९ कोटींची तरतूद

>> गेल्या ४ वर्षांत १४० सिंचन योजना पूर्ण केल्या

>> दुष्काळी भागात मागेल त्याला शेततळे योजना सुरू

>> चार कृषिविद्यापीठांसाठी ६०० कोटींची तरतूद

>> जलयुक्त शिवार योजनेसाठी ८९४६ कोटींचा खर्च

>> जलसिंचन योजनेसाठी १ हजार ५३० कोटींची तरतूद

>> १ लाख ६७ हजार शेततळ्यांची कामं पूर्ण

English summary :
Divyangan Gharkul Scheme : The Government has announced the Gharkul scheme for the Divyangan. The Finance Minister announced that the government has made a provision of Rs 100 crore for this scheme.


Web Title: Maharashtra Budget 2019: House Plan for handicapped; 100 crore provision! by sudhir mungatiwar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.