Maharashtra Budget 2019: Government gifts to OBC, Dhangar and minorities before 'Mission Election' | महाराष्ट्र बजेट 2019: 'मिशन इलेक्शन'आधी ओबीसी, धनगर, अल्पसंख्याकांना सरकारची भेट
महाराष्ट्र बजेट 2019: 'मिशन इलेक्शन'आधी ओबीसी, धनगर, अल्पसंख्याकांना सरकारची भेट

मुंबई- फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला असून, त्यात ओबीसींंसाठी भरीव तरतूद करण्यात आल्या आहेत. ओबीसी मुला-मुलींच्या वसतिगृहाची बांधणी करण्याकरिता दोनशे कोटी रुपये देणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. या योजनेंतर्गतओबीसी मुला-मुलीसाठी 36 वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत. संजय गांधी अन् श्रावणबाळ योजनेचे मानधन 600 वरून 1000 रुपये करण्याची तरतूदही या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.

धनगर समाजाच्या कल्याणासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी आदिवासी विभागाच्या बजेटला धक्का लागणार नसून स्वतंत्रपणे तरतूद करण्यात आली आहे. अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली असून, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या महिला कल्याणासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद मालेगाव येथे आयटीआय सुरू करणार आहे. 

English summary :
Maharashtra Budget 2019: The government has announced that OBC will provide 200 crores of rupees for the construction of boys and girls hostels. Under this scheme, 36 hostels will be constructed for OBC boys and girls. One thousand crore rupees have been made for the welfare of Dhangar community.


Web Title: Maharashtra Budget 2019: Government gifts to OBC, Dhangar and minorities before 'Mission Election'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.