Join us

लाऊड स्पीकर, मेगा फोनच्या वापरावरही बंदी

By admin | Updated: July 16, 2015 00:27 IST

महानगरात अतिरेकी हल्ला किंवा समाजकंटकांकडून घातपाती कृत्य होण्याच्या शक्यतेने मुंबई पोलिसांनी लाऊड स्पीकर, मेगा फोन व वाद्यवृंदांच्या साहित्य वापरास मज्जाव केला आहे.

मुंबई : महानगरात अतिरेकी हल्ला किंवा समाजकंटकांकडून घातपाती कृत्य होण्याच्या शक्यतेने मुंबई पोलिसांनी लाऊड स्पीकर, मेगा फोन व वाद्यवृंदांच्या साहित्य वापरास मज्जाव केला आहे. त्याचप्रमाणे पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित फिरण्यासही अटकाव करण्यात आला आहे. येत्या शुक्रवारपासून (१७ जुलै) ३१ जुलैपर्यंत ही बंदी घालण्यात आलेली आहे. अर्थात समारंभ, धार्मिक कार्यक्रमासाठी हे नियम शिथिल करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त (विशेष अभियान) संजय बारकुड यांनी हे आदेश दिले आहेत. ईदच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.