चार वर्षांनी तयार होणाऱ्या घरांची म्हाडा काढणार लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 12:38 AM2020-02-25T00:38:53+5:302020-02-25T00:39:03+5:30

१५ मार्चला सोडत; बीडीडी चाळीतील २६० रहिवाशांचा समावेश

Lottery to draw Mhada of houses built after four years | चार वर्षांनी तयार होणाऱ्या घरांची म्हाडा काढणार लॉटरी

चार वर्षांनी तयार होणाऱ्या घरांची म्हाडा काढणार लॉटरी

Next

मुंबई : ना.म जोशी मार्गावरील बीडीडी चाळीतील ज्या रहिवाशांनी पुनर्विकासाच्या कामासाठी घरे रिकामी करून दिली आहेत, अशा २६० रहिवाशांना म्हाडामार्फत १५ मार्च २०२० रोजी काढण्यात येणाºया लॉटरीमध्ये घरे दिली जावीत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यामुळे अंदाजे चार वर्षांनी तयार होणाºया इमारतीमध्ये आपले घर कुठे असेल हे रहिवाशांना आताच समजणार आहे.

ना.म. जोशी मार्गाच्या बीडीडी चाळीतील ८०० पैकी २६० रहिवासी पहिल्या टप्प्यात संक्रमण शिबिरात (ट्रान्झिट कॅम्प) स्थलांतरित झाले. उर्वरित रहिवाशांनी अजून घरे रिकामी केली नाहीत. जे २६० रहिवासी घरे रिकामी करून संक्रमण शिबिरात स्थलांतरित झाले होते, त्यांच्यासाठी सोडत काढून त्यांना करारासह नवीन घरे द्यावीत. असे केल्याने उर्वरित रहिवाशांमध्ये विश्वास निर्माण होऊन ते घरे रिकामी करतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बीडीडी चाळीसंदर्भात बैठक नुकतीच संपन्न झाली. या वेळी त्यांनी या सूचना केल्या.

‘सरकारी कर्मचाऱ्यांनाही स्थलांतरित करा’
बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प विशेष प्रकल्प म्हणून हाताळला जावा, तसेच या कामाला गती द्यावी, अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. ते म्हणाले, तिथे राहत असलेल्या रहिवाशांमध्ये जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करावे. या कामासाठी उपजिल्हाधिकारी यांच्या नियुक्तीसह समर्पित भावनेने काम करणाºया अधिकाºयांची टीम तयार करावी. ना.म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाप्रमाणेच नायगाव, शिवडी आणि वरळी येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला वेग द्यावा. टप्प्यांची निश्चिती करून येथेही काम सुरू केले जावे, अशा सूचनाही त्यांनी या वेळी केल्या.

Web Title: Lottery to draw Mhada of houses built after four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा